समुद्राच्या मधोमध असलेला 600 वर्ष जुना चमत्कारिक हाजी अली दर्गा! कितीही उंच लाटा असल्या तरी दर्ग्यात शिरत नाही पाणी

वनिता कांबळे Mon, 17 Jun 2024-5:15 pm,

हाजी अली दर्गा अत्यंत चमत्कारिक वास्तू मानली जाते. कारण 26 जुलै 2006 रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. सर्वत्र मोठे नुकसान झाले होते. मात्र, सर्वत्र मोटा विनाश झाला असताना हाजी अली दर्ग्याचे काहीच नुकसान झाले नव्हते. 

 

समुद्र कितीही खवळला असला आणि किती उंच लाटा उसळत असल्या तरी समुद्राचे पाणी दर्ग्याच्या आत शिरत नाही. रस्त्या पाण्याखाली गेल्यावर दर्ग्यात आता असलेल्या लोकांना बाहेर जाता येतनाही आणि आता असलेल्यांना बाहेर पडता येत नाही.

समुद्राच्या किनाऱ्यापासून दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी सिमेंटचा रस्ता आहे. समुद्राला भरती आल्यावर हा रस्ता पाण्याखाली जातो.

 

बाबा हाजी अली आणि त्याचा भाऊ आणि आई यांच्या परवानगीने ते मुंबईतील वरळी भागात राहायला आले होते. मात्र, इस्लामचा प्रचार करण्यासाठी ते येथेच राहिले. 

सुंदर आणि भव्य दर्गा मुंबईच्या मध्यभागी बांधला आहे. ज्याची देखभाल सुन्नी गटातील बरेलवी पंथ करतात.

हाजी अली दर्गा हा मुस्मिम बांधवांचे श्रद्धास्थान आहे. येथे मनापासून प्रार्थना केल्यावर इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

 या दर्ग्याचे बांधकाम पांढऱ्याशुभ्र ‘मक्करा’ संगमरवरांनी केले आहे. 

 

हाजी अली दर्ग्याची स्थापना इसवी सन 1631  मध्ये झाली. 

  4.500  चौ. मीटर क्षेत्रात हाजी अली दर्गा  पसरलेला आहे.याचे बांधकाम सुमारे 85 फूट उंचीचे आहे. समुद्राच्या मदोमध असलेल्या या दर्ग्याची भव्यता दूरनही पाहता येते.

हाजी अली दर्गा इस्लामिक वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. याच्यावर मुघल व इंडो-इस्लामिक बांधकाम शैलीचा प्रभाव  दिसतो.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link