IPL 2024 : मुंबई इंडियन्स सोडल्यावर रोहित कोणत्या संघात जाणार? अंबाती रायडू म्हणतो...
रोहित शर्मा त्याच्या क्रिकेट कारकीर्दीच्या शिखरावर आहे. आक्रमक फलंदाजी आणि मैदानावरील कर्णधारपदाच्या निर्णयांमुळे चाहते त्याच्यावर प्रेम आजही करतात.
रोहितच्या कॅप्टन्सीमुळे वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला फायनल गाठता आली असली तरी रोहितला मुंबई इंडियन्सने नारळ दिला.
अशातच अनेक दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा इतर फ्रँचायझीकडे जाण्याच्या शक्यतेवर चर्चा करत आहेत. त्यामुळे आता रोहितच्या निर्णयावर अनेकांचं लक्ष लागलंय.
अशातच रोहित कोणत्या संघात जाईल? असा सवाल जेव्हा अंबाती रायडूला विचारण्यात आला. तेव्हा त्यांने स्पष्ट उत्तर दिलं.
शेवटी हा रोहित शर्माचा निर्णय असेल त्याला कोणत्या संघात जायचंय. मात्र, प्रत्येक संघाला त्याला आपल्या टीमचा कॅप्टन करायला आवडेल, असंही रायडू म्हणाला आहे.
त्यावेळी बोलताना रायडूने मुंबई इंडियन्सला टोला देखील लगावला होता. तो ज्या संघात जाईल तेव्हा कमीतकमी त्याला आत्तासारखी वागणूक तरी मिळणार नाही, असं अंबाती रायडूने म्हटलं आहे.
हिटमॅन पुढची आणखी 5 ते 6 वर्ष आयपीएल खेळू शकतो. धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा सर्वोत्तम उमेदवार असल्याचं वक्तव्य अंबातीने काही दिवसांपूर्वी केलं होतं.