Jawa Perak चा नवा लूक, रंग आणि फिचर्स पाहताच प्रेमात पडाल; किंमत किती माहितीये?

Thu, 11 Apr 2024-12:49 pm,

Jawa Perak चा नवा लूक, रंग आणि फिचर्स पाहताच प्रेमात पडाल; किंमत किती माहितीये? 

Jawa Perak New Look: जावा या मोटरसायकल निर्मात्या कंपनीकडून नुकतंच दोन कमाल बाईकमध्ये काही नव्या गोष्टी जोडण्यात आल्या आहेत. या दोन बाईक म्हणजे जावा पेराक (Jawa Perak) आणि 42 बॉबर (42 Bobber). 

Jawa Perak features and price : नव्यानं सादर करण्यात आलेल्या जावा पेराकमध्ये stealth डुअल टोन पेंटचा वापर करण्यात आला आहे. तर, 42 बॉबरमध्ये असणारे अलॉय व्हील्स बदलण्यात आले आहेत. 

जावा पेराकच्या stealth डुअल टोन पेंटसोबतच बाइकचा टँक आणि फ्युअल कॅपमध्ये टँक सीट आणि ब्रास डिटेलिंग जोडण्यात आलं आहे. बाईकचे फुट पेग्ससुद्धा बदलण्यात आले आहेत. हे फुट पेग्स पुढील बाजूस 155 मिमीनं वाढवण्यात आले आहेत. 

जावा पेराकमध्ये 334 cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं असून, त्यातून 7500 rpm वर 29.9 hp इतकी पॉवर जनरेट होते. तर, 5500 rpm वर 30 Nm इतका टॉर्क जनरेट होतो. 

280 mm फ्रंट डिस्कसह ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएस सोबत 240 mm रिअर डिस्क देण्यात आलेली ही बाईक जावा 350 च्या तुलनेत या चांगला परफॉर्मन्स देते. 

किमतीचं म्हणावं तर पाहताक्षणी नजरेत भरणारी ही बाईक खरेदी करण्यासाठी तशीच किंमतही मोजावी लागत आहे. पण, आर्थिक नियोजनातून हे स्वप्नही बाईकप्रेमी साकारू शकतात.  

जावा पेराकची एक्स शोरूम किंमत 2.13 लाख रुपये इतकी आहे. तर, जावाच्या 42 बॉबरची किंमत 2.10 लाख ते 2.30 लाख रुपयांच्या घरात आहे. (सर्व छायाचित्र- जावा/ इन्स्टाग्राम)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link