बँकेचं कर्ज फेडलं, आता पंतप्रधानांच्या `या` योजनेला टार्गेट, मिळणार पैसाच पैसा; अनिल अंबानींची संपत्ती किती?
अनिल अंबानींनी कंपन्यांवरील कर्जाचा बोजा उतरवल्या त्याशिवाय, नवीन कंपन्याही सुरू करत आहेत. अनिल अंबानींच्या मुलांनी या व्यवसायात प्रवेश केल्यानंतर कंपन्यांची स्थिती कमालीची सुधारलीय.
अनिल अंबानींच्या नवीन कंपनीचे नाव रिलायन्स जय प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आहे. त्यांनी मुलगा जय अनमोल याच्या नावाने नवीन कंपनी सुरू केलीय. यासाठी जय अनमोल अंबानी, जय अंशुल अंबानी यांच्यापासून ते त्यांची सून क्रिशा शाहपर्यंत ते कुटुंबाने व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम केलंय.
रिअल इस्टेटवर लक्ष केंद्रित करून अनिल अंबानी यांनी त्यांची नवीन योजना सुरू केलीय. अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स जय प्रॉपर्टीजला प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-U) 2.0 चा लाभ मिळू शकतो. शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरं उपलब्ध करून देणे हे पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 मध्ये, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय. चालू आर्थिक वर्षात या योजनेवर 10 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या अर्थसंकल्पातील सर्वाधिक रक्कम या योजनेत खर्च करण्यात येणार आहे. साहजिकच सरकारच्या या योजनेबाबतचा निर्णय रिअल इस्टेट कंपन्या घेणार आहेत. अनिल अंबानीही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
नवीन कंपनीसोबतच त्याच्या रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स पॉवरचे कर्जही कमी झालं. रिलायन्स कॅपिटलला नवीन खरेदी मिळाली. हिंदुजा समूहाने कराराच्या दिशेने पावले उचलली आहेत. आता सर्व बाजूंनी अनिल अंबानींसाठी चांगले संकेत येत आहेत.
रिलायन्स कॅपिटलला 9861 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या हिंदुजा ग्रुपने 2750 कोटी रुपये एस्क्रो खात्यात ट्रान्सफर केले आहेत. रिलायन्स इन्फ्राचा तोटा 69.47 कोटी रुपयांवर आला आहे. वर्षभरापूर्वी हाच तोटा 494.83 कोटी रुपये होता.
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदार आनंदी आहेत. अहवालानुसार, 800 कोटींची थकबाकी भरल्यानंतर रिलायन्स पॉवरनेही बँकांची थकबाकी भरली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात रिलायन्स पॉवरने 1023 कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याची बातमीही आली होती. अनिल अंबानी यांनी डिसेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान हे काम केलंय. कंपनीकडे आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि डीबीएससह इतर बँकांचं कर्ज होते.
अनमोल अंबानी यांनी त्यांच्या व्यवसायाची एकूण संपत्ती 2000 कोटींहून अधिक केली आहे. अनमोलने स्वतःच्या बळावर हा व्यवसाय उभा केला आहे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आपलं काम करण्यात व्यस्त आहे. यानंतर अनमोल त्याच्या वडिलांसह कुटुंबासाठी आशेचा किरण बनला आहे.
रिलायन्स इन्फ्राचे मार्केट कॅप सध्या 8,645 कोटी रुपये आहे आणि रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप 12,553 कोटी रुपये आहे. एकूणच, दोन्ही कंपन्यांचे मार्केट कॅप 21000 कोटींच्या पुढे गेले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या 2023 च्या अहवालानुसार अनिल अंबानींची संपत्ती 250 कोटी रुपये आहे. कंपन्या कर्जमुक्त झाल्यानंतर आणि त्यांचे शेअर्स वाढल्यानंतर त्यांच्या नेटवर्थशी संबंधित माहिती समोर आलेली नाही.