कॅप्टन रोहित शर्मासमोर BCCI सचिव जय शहांची मोठी भविष्यवाणी, `बार्बाडोसमध्ये झेंडा रोवला तसा...`
बार्बाडोसमध्ये नक्कीच आपण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय झेंडा फडकवू, असं जय शहा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर रोहित शर्माने फायनल सामन्यातील विजयानंतर झेंडा मैदानात रोवला होता.
जय शहांची ही भविष्यवाणी खरी ठरली होती. अशातच आता जय शहांनी आणखी मोठी भविष्यवाणी केली असून टीम इंडियाला टार्गेट ठरवून दिलं आहे.
जर आम्हाला 140 कोटी भारतीयांचा आशीर्वाद मिळाला तर आम्ही अशीच कामगिरी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि महिलांच्या टी-20 विश्वचषकात करू, असं वक्तव्य जय शहा यांनी केलं आहे.
CEAT क्रिकेट रेटिंगच्या पुरस्कार सोहळ्यात जय शहा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे. त्यावेळी रोहित शर्मा देखील उपस्थित होता.
बार्बाडोसमध्ये झेंडा फडकवू हे वक्तव्य रोहित शर्माची कॅप्टन्सी जाहीर करण्यासाठी केलं होतं. मात्र, यंदा शहांनी भविष्यवाणी करताना नाव न घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शाह आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार आहेत. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे