`अशा` पद्धतीने फणस खाल्ला तर होतील `हे` चमत्कारिक फायदे

Tue, 02 Jul 2024-8:00 pm,

आंबापोळी प्रमाणेच फणसपोळी देखील तितकीच चवीने खाल्ली जाते. 

फणसामध्ये विटामिन ए, सी, थायमिन, पोटेशियम, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, आयर्न आणि झिंकची मात्रा मुबलक प्रमाणात असते. 

अनेकांना सकाळी उठल्यावर चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते. रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफीच्या सेवनाने शरीरावर गंभीर परिणाम होतात. 

 

सकाळी उठल्यावर फळांचं सेवन केल्याने फक्त रोगप्रतिकारक शक्तीच नाही तर त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

रोज सकाळी एक कप दुधात फणसाचे गरे, वेलची, ड्राय फ्रुट्स आणि चवीपुरती साखर टाकून याचा मिल्कशेक बनवून प्या. नाश्त्याला फणसाचा मिल्कशेक प्यायल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारते. 

सांधेदुखीचा त्रास होत असल्यास सिझनमध्ये फणसाचे गरे किंवा ज्यूसचं सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. 

फणसामध्ये अँटीऑक्सि़डंट्स प्रमाण जास्त असतात, त्यामुळे हृदय विकाराच्या रुग्णांसाठी फणसाचे गरे आरोग्यदायी ठरतात. 

 

रक्ताच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबीन कमी असणं किंवा थॅलेसेमिया सारखे आजार बळावतात. फणसाच्या सेवनाने रक्तातील लोह वाढण्यास मदत होते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link