ब्रेझा, नेक्सॉनही टाकलं मागे; सर्वाधिक विक्री होणारी `ही` कार तुमच्याही खिशाला परवडेल, पाहिलीत का?

Fri, 06 Oct 2023-3:15 pm,

Best Selling Cars : साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय ऑटो क्षेत्राला चांगली उसळी मिळते. सणासुदीचे आणि पगारवाढीचे हे दिवस असल्यामुळं इथं अनेकांचाच कल कार खरेदीकडे दिसून येतो

भारतीयांची पसंती असणारी अशीच एक कार सध्या अनेकांचीच पसंती मिळवताना दिसत आहे. मुख्य म्हणजे बऱ्याचजणांच्या खिशाला ही कार परवडत आहे. 

 

ही आहे Maruti Baleno कार. सप्टेंबर महिन्यात या कारच्या 18,417 यूनिट्सची विक्री झाली. पण, सप्टेंबर 2022 च्या तुलनेत हा खप 5 टक्क्यांनी कमीच होता. 

सप्टेंबर महिन्यात Maruti Wagon R च्या 16,250 युनिट्सची विक्री झाली. वार्षिक आकडेवारीनुसार या कारचा खप 19 टक्क्यांनी कमी झाला. 

 

Tata Nexon च्या एकूण 15325 युनिटची विक्री सप्टेंबर महिन्यात झाली आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत हा खप 6 टक्क्यांनी वाढल्याचं लक्षात आलं. 

Maruti Brezza ही गेल्या काही काळापासून अनेकांच्याच आवडीची कार असली तरीही यंदाच्या सप्टेंबर महिन्या या कारचे 15001 युनिट विकले गेले. वार्षिक सरासरीत हा खप 3 टक्क्यांनी कमी होता. 

 

सप्टेंबरमध्ये Maruti Swift च्या 14703 युनिटचा खप झाला. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा खप तब्बल 23 टक्क्यांनी जास्त होता. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link