Skin Care Tips : कपाळावर टिकली लावल्याने होते अ‍ॅलर्जी?

Thu, 15 Jun 2023-3:58 pm,

कपालावर कुंकू किंवा टिकली लावणे हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. याशिवाय काही महिलांना टिकली लावणे पसंत असते. पण काही स्त्रिया-तरुणी आवड असतानाही टिकली लावणे टाळतात, यामागील कारण म्हणजे अॅलर्जी... 

जर तुम्हाला टिकलीची ऍलर्जी असेल तर टिकली लावण्यापूर्वी कपलावर थोड तिळाचे तेल लावावे. जेणेकरून टिकली गोंद तुमच्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही. तिळाचे तेल तुमच्या त्वचेला थर या गोंदापासून संरक्षण करण्यास मदत करतो. 

कडुलिंबाच्या पानांप्रमाणेच कडुलिंबाचे तेलही तुमच्या सौंदर्यासाठी चांगले आहे. यामुळे, तुमच्या त्वचेचा संसर्ग कमी होऊ शकतो. टिकली लावण्यापूर्वी थोडेसे कडुलिंबाचे तेल लावल्यास टिकली लावल्यानंतर येणारी खाज सुटणार नाही. टिकलीमुळे होणार इनफेक्शनस, खाज कमी करण्यासाठी अँटिसेप्टिक तेल नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. 

त्वचेच्या कोणत्याही समस्येवर खोबरेल तेल फायदेशीर आहे. कारण किंवा तेल अॅटी ऑक्सिडंट असतात. ऍलर्जीमुळे खाज येत असेल तर तेलात थोडा कापूर टाका. कापूर विरघळल्यानंतर केसांना तेल लावा. कापूर विरघळल्यानंतर ते तेल तुमच्या टाळूवरील जळजळ कमी होईल आणि अॅलर्जीही नष्ट होईल. 

टिकलीने खाज येत असेल तर अशा लोकांनी टिकलीचा वापर नक्कीच करु नये. फक्त खास प्रसंगी, सणसमारंभाला जर तुमच्या टिकली लावण्‍याची हौस असेल तर जास्त चिकट गोंद नसलेली टिकली लावावी अन ती देखील थोड्यावेळासाठीच. 

 

सर्व उपाय करुनही तुम्हाला टिकली लावल्यावर  खाज येत असेल तर टिकली ऐवजी कुंकवाचा वापर करावा. शुद्ध आणि रसायनमुक्त कुंकू वापरल्याने तुम्हाला ऍलर्जीचा त्रास होणार नाही. शिवाय कुंकू लावण्य तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यास मदत करेल.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link