Blood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!

Fri, 06 Jan 2023-12:27 pm,

दररोज तुम्ही हलके पुलके व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर रक्तातील साखर कमी करण्यासाठी चालणे, घरकाम यासारख्या शारिरीक क्रिया करणं चांगलं असतं. जेव्हा आपण नियमितपणे हालचाल करणार नाही किंवा चालणार-फिरणार नाही तेव्हा रक्तातील ग्लूकोजची पातळी कधी वाढेल हे कळणार नाही. 

आहारात साखर आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असेल तरीही ब्लज शुगरमध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच फळांमध्ये केळीचे सेवन कमी करा. त्या ऐवजी आहारात व्होल व्हीट ब्रेड, प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थ, ब्राउन राईस, फळे आणि भाज्या यांची समावेश करावा.  

रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होण्यासाठी झोप कमी घेणे हे कारणही जबाबदार ठरू शकते. कारण जेव्हा आपण गाढ झोपी जाता तेव्हा तुमची मज्जासंस्था मंदावते आणि मेंदू कमी ब्लड शुगरचा वापर करायला लागतो.

इन्सुलिन आपल्या रक्तातिल साखर कमी करू शकतो. पण एक चुकीचा डोस देखील ब्लड शुगर कमी करू शकतो. रक्तातील साखर कमी करण्यासाठी कार्टिकोस्टेरॉइ़डसारखी औषध उपयोगी मानली जातात.  

धूम्रपान केल्याने मधुमेहाचे प्रमाण वाढू शकते. जर तुम्ही आधीपासूनच मधुमेहाने ग्रस्त असाल तर रक्तातील साखर नियंत्रित करणे इतके सोपे नाही. धूम्रपान केल्याने रक्तातील साखरेची पातळी खाली आणणे कठीण होते. म्हणून जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ताबडतोब ते थांबवा. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link