अभिनयात फ्लॉप पण व्यवसायात टॉप, कधीकाळचे `हे` बॉलीवूड स्टार्स आज करतायत छप्परफाड कमाई

Pravin Dabholkar Tue, 28 May 2024-7:38 pm,

Bollywood Star Earning From Business : बॉलिवूडचे अनेक स्टार्स अभिनयात फ्लॉप झाले पण व्यवसायात टॉपवर पोहोचले.हे बॉलीवूड स्टार्स सध्या छप्परफाड कमाई करतायत. यांच्याबद्दल जाणून घेऊया.  

'स्टाईल' चित्रपटामुळे साहिल खान सर्वांच्या लक्षात राहिला. पण त्यामुळे तो बॉलिवूडमध्ये फारसे नाव कमवू शकला नाही. असे असताना फिटनेस इन्फ्लुएंसर बनून तो सध्या करोडो रुपयांची कमाई करत आहे.

'तुम बिन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवलेली अभिनेत्री म्हणजे संदाली सिन्हा. होता. यानंतरही संदली अनेक चित्रपटांमध्ये दिसली नाही. सध्या ती 'कंट्री ऑफ ओरिजिन' नावाच्या बेकरीमधून चांगली कमाई करतेय.

 

'कोई मिल गया' फेम स्टार रजत बेदीला कोणी कसे विसरू शकेल. पण रजत बेदी यानंतर सिनेमात फारशी चमक दाखवू शकला नाही. सध्या तो परदेशात व्यवसाय करुन चांगली कमाई करत आहेत.

'राम तेरी गंगा मैली' चित्रपटातील आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी मंदाकिनी. सध्या मंदाकिनी ही तिबेटियन मेडिसिन सेंटरमधून पैसे कमवते. याशिवाय ती प्रसिद्ध योगा ट्रेनरदेखील आहेत.

अभिनेता राहुल खन्ना बॉलीवूडमध्ये जास्त फेम मिळवू शकला नाही. तिथे त्याला जास्त कमाई करता आली नाही. असे असले तरी राहुल खन्ना मॉडेलिंगच्या जगात खूप नाव कमावत आहे.

ट्विंकल खन्ना काही चित्रपटांमध्ये दिसली होती पण ती बॉलिवूडमध्ये छाप पाडू शकली नाही. आता ट्विंकल खन्ना निर्माती आणि लेखिका बनून मोठी कमाई करत आहे. 

उदय चोप्राने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. पण उदय चोप्राला प्रसिद्धी मिळवता आली नाही. उदय चोप्रा आता 'योमिक्स' कंपनीच्या व्यवसायात नाव कमवत आहेत.

'पापा कहते हैं' आणि 'होगी प्यार की जीत' या चित्रपटामुळे  मयुरी कांगो प्रसिद्ध झाली. सध्या ती गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री लीडर बनून मोठी कमाई करत आहे.

एकेकाळी कुमार गौरव बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध नाव होते. पण काही काळानंतर कुमार गौरवने फिल्मी दुनियेकडे पाठ फिरवली. कुमार गौरव आता मालदीवमधील त्याच्या ट्रॅव्हल बिझनेसमधून कमाई करत आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link