Health Tips : धकाधकीच्या आयुष्यात पोलादी हाडं पाहिजेत? आहारात करा `या` पदार्थांचा समावेश
धकाधकीच्या आयुष्यात तुमची हाडं तर मजबूत ठेवायची असतील तर काय केलं पाहिजे? यावर आहारतज्ज्ञ प्रियांका जयस्वाल यांनी दिली आहे.
पालकामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते. जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायची असतील तर तुमच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करणे फायद्याचे असते. सर्वात महत्वाचं म्हणजे पालक खाल्ल्याने हाडांना 25 टक्के कॅल्शियम मिळते.
दहीमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. दुधापेक्षा जास्त दही खाल्ल्यास कॅल्शियम जास्त मिळते. त्यामुळे हाडांच्या समस्यांपासून सुटका मिळवायची असल्यास आहारात दुधाचा समावेश करावा.
अननसमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याशिवाय अननसामध्ये पोटॅशियम देखील जास्त प्रमाणात आढळते.
व्हिटॅमिन ई सोबतच प्रथिने, झिंक आणि कॅल्शियम देखील बदामामध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते बदाम केवळ मेंदूच तीक्ष्ण बनवत नाही तर हाडेही मजबूत करतो.
कॅल्शियम शरिरातील हाडांच्या चांगल्या विकासासाठी फार महत्वाचं आहे. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल वाढत्या वयात सांधेदुखी, हाडाचे इतर विकार उद्भवू शकतात.