चाणक्य नितीः अशा मुलींपासून चार हात लांबच राहा, लग्नाचा विचारही नको!

Mansi kshirsagar Mon, 06 Nov 2023-2:46 pm,

लग्नासाठी जोडीदार शोधताना निरखून पारखून घेतला जातो. नाहीतर घरात वादाची ठिणगी पडायला वेळ लागत नाही. चाणक्य नितीतही जोडीदाराची पारख कशी करायची याबाबत सांगितले आहे. तुम्हीदेखील लग्नासाठी मुलगी निवडताना चाणक्य नितीत सांगितलेल्या या गोष्टींची पारख करुन घ्या. 

चाणक्य निती ही आचार्य चाणक्य यांनी लिहलेली आहे. आजही त्यातीत सांगितलेल्या गोष्टी अगदी चपखल बसतात. सुखी संसारासाठी, आर्थिक व्यवहार आणि रोजच्या जीवनात आचरण कसे असावे याबाबत नमूद केले आहे. चाणक्य नितीनुसार मुलांसाठी कशा मुली शोभून दिसतात हे पाहून घेऊया. 

चाणक्य नितीनुसार, मुलीचा धार्मिक कामावर विश्वास असेल अशी मुलगी जोडीदार होण्यास उत्तम असते. मुलीला कष्टाची जाणीव असते अशी मुलगी घर सांभाळण्याचे काम अत्यंत चोख बजावते. धर्म आणि कर्म अशा दोन्हींची माहिती नसल्यास मुली अनेकदा घर फोडण्याचे काम करतात. 

लग्नासाठी मुलगी निवड करताना तिचा स्वभाव रागीट असता कामा नये याची खातरजमा करुन घ्या.जी छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत असेल तर घरात शांतता नांदणार नाही. 

संसारात आईचा वाढता सहभाग असेल तर मुलीचे घर तुटायला वेळ लागत नाही. मुलीची आई तिच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करत असेल आणि तिचे बाबा शांतच असतात त्या घरातील मुलीशी कधीच लग्न करु नका.

 

चाणक्य नितीमध्ये अशा मुलीसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला जातो तिला चांगले संस्कार आहेत व चारचौघात कसे वागावे, याचे ज्ञान आहे. मुलीच्या वागण्या-बोलण्यात आणि उठण्या-बसण्यातून अनेक गोष्टी दिसून येतात

 

लग्न करताना मुलगी हा समाधानकारी असावी याची खात्री करुन घ्या. ज्या स्त्रियांमध्ये लोभाची भावना असते त्यांचे वैवाहित जीवन आनंदी नसते.  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link