2023 मध्ये `शोले` बनवला तर जय-विरु कोण? कशी असेल संपूर्ण कास्ट? ChatGPT चं उत्तर पाहिलं का?

Swapnil Ghangale Tue, 20 Jun 2023-5:00 pm,

भारतीय चित्रपट सृष्टीमधील ऑल टाइम हिट चित्रपटांमध्ये शोले चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं. हा मल्टी स्टारर चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट आज प्रदर्शित झाला तर त्यात कोण कोणती भूमिका साकारेल? हाच प्रश्न ChatGPT ला विचारण्यात आला.

म्हणजेच 'शोले' चित्रपट प्रदर्शित होऊन 48 वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारे अनेक कलाकार म्हातारे झाले आहेत.

'शोले' चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी या तिघांची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट रमेश सिप्पींनी दिग्दर्शित केला होता.

हाच आयकॉनिक चित्रपट आज म्हणजेच 2023 साली बनवण्यात आला तर त्यामध्ये कोणते कलाकार असतील? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही विचार सुरु ठेवा मात्र याच प्रश्नाला ChatGPT ने उत्तर दिलं असून

ChatGPT ने दिलेल्या उत्तरामध्ये केवळ जय-वीरु यांच्या जागी कोणते अभिनेते असतील हेच सांगितलंय असं नाही तर ठाकूर आणि सूर्मा भोपालीची भूमिका कोण साकारु शकतं याबद्दलचाही सल्ला दिला आहे.

1975 साली प्रदर्शित जालेल्या चित्रपटामध्ये जयची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. तर विरुची भूमिका धर्मेंद्र यांनी साकारलेली. मात्र या दोघांना रिप्लेस करुन आज चित्रपट तयार करायचा झाल्यास कोणं या भूमिका चांगल्या प्रकारे करेल असं ChatGPT ला विचारलं असता त्याने अगदीच भन्नाट सजेशन दिलेत.

ChatGPT ने दिलेल्या सल्ल्यानुसार, आजच्या घडीला 'शोले' रिक्रिएट करण्यात आला तर अभिनेता शाहरुख खान जयची भूमिका अगदी उत्तम प्रकारे साकारु शकतो. म्हणजेच 2023 च्या शोलेमध्ये शाहरुख अमिताभ यांना रिप्लेस करु शकतो, असं ChatGPT म्हणतंय.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूळ चित्रपटामध्ये जयची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 2023 च्या 'शोले'मध्ये चक्क विरुची भूमिका शोभेल असं ChatGPT चं म्हणणं आहे.

गब्बर सिंगची भूमिका सध्याचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह उत्तम निभावू शकतो, असा ChatGPT चा अंदाज आहे. मूळ चित्रपटामध्ये गब्बरची भूमिका अमजद खान यांनी साकारली होती. 

अमजद खान यांनी साकारलेल्या गब्बर सिंगच्या भूमिकेचे अनेक संवाद आजही अजरामर संवादांमध्ये आहेत.

मूळ 'शोले' चित्रपटामध्ये ठाकूरची भूमिका संजीव कुमार यांनी साकारली होती. ही भूमिका आजच्या घडीला विकी कौशल उत्तम प्रकारे साकारु शकतो असं ChatGPT ने सांगितलं.

विकीचा सध्या 'जरा हटके, जरा बचके' चित्रपट तिकीटबारीवर समाधानकारक कामगिरी करत आहे. 'मसान' आणि 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'सारख्या चित्रपटामध्ये विकीने त्याच्यातील अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे.

मूळ चित्रपटात सूरमा भोपालीची भूमिका जगदीप यांनी साकारली होती.

ChatGPT ने सूरमा भोपालीची भूमिका आजच्या घडीला म्हणजेच 2023 साली आयुष्मान खुराना अधिक उत्तम पद्धतीने साकारु शकतो असं सांगितलं आहे.

हेमा मालिनी यांनी साकारलेली बसंतीची भूमिका सध्याच्या घडीला आलिया भट्ट अगदी उत्तम प्रकारे साकारु शकते असं ChatGPT ने म्हटलं आहे.

तुम्हाला या साऱ्या नव्या स्टार कास्टबरोबर हा 2023 मधील शोले पहायला आवडेल का, हे कमेंट करुन नक्की सांगा.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link