धोनी टी20 मधून निवृत्त होणार ?

Mon, 29 Oct 2018-1:18 pm,

वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध होणाऱ्या टी-20 सीरीजमध्ये माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला वगळल्याने चर्चांना उधाण आलं आहे. धोनीला विश्रांती दिल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती पण धोनीला संघातून वगळल्यांचं आता समोर येत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने माहिती दिली आहे की, 'निवड समितीच्या बैठकीआधीच सदस्यांनी टीम मॅनेजमेंटच्या माध्यमातून धोनीला याची सूचना दिली होती की, त्याला संघातून वगळण्यात येणार आहे.'

बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटलं की, 'धोनीचं आता टी-20 क्रिकेटमध्ये आगमन होणं अवघड आहे. पण सध्या तो वनडे क्रिकेटचा भाग असणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 2020 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनी नसणार आहे त्यामुळे टी-20 टीममध्ये त्याला खेळवण्याचं कोणतंही कारण नाही.'

भारताच्या टी-20 टीममधून बाहेर झाल्यानंतर कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीचा कदाचित ही शेवटची सिरीज असू शकते. एका फॉरमॅटमधून बाहेर करत निवड समितीने याचे संकेत देखील दिले आहेत.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही निवड समितीच्या बैठकीत उपस्थित होते. त्यांच्या समोरच धोनीला वगळण्याचा निर्णय झाल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे.

धोनीने 2018 मध्ये 7 टी-20  सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात सर्वाधित त्याने 28 बॉलमध्ये नाबाद 52 रन्सची खेळी केली आहे. बाकी 6 इनिंगमध्ये त्याने 51 बॉलमध्ये 71 रन केले आहेत. धोनी पुढचे 2 महिने अभ्यास सामने देखील नाही खेळू शकणार. कारण भारताची पुढची वनडे सिरीज जानेवारी ते मार्चमध्ये होणार आहे.

निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी धोनीला पर्याय आणि विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतवर विश्वास दाखवला आहे. धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती आणि कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जरी अचानक घेतला असला तरी त्याला जवळून जाणणाऱ्या लोकांना ही गोष्ट माहित असेल की या निर्णयामागे खूप विचार झाला असेल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link