Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित

Surendra Gangan Sat, 08 Oct 2022-7:47 am,

जर तुम्हाला दिवसभर सामान्य कामे करायची असतील, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्वतःला हायड्रेट ठेवावे लागेल, तुम्ही सकाळी एक ग्लास पाणी प्यावे, यामुळे तुमची आतडे स्वच्छ होतील आणि पचन देखील चांगले होईल आणि चयापचय देखील चांगले होईल. 

डायबिटीजच्या (Diabetes) रुग्णांसाठी मॉर्निंग वॉक (सकाळचे चालणे) खूप महत्वाचे आहे, यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेचा (Blood Sugar Level) योग्य वापर होतो. मॉर्निंग वॉक हा एक उत्तम व्यायाम आहे, यामुळे शरीर सक्रिय होते तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी दररोज सकाळी उठून रक्तातील साखरेची तपासणी करणे (Blood Sugar) आवश्यक आहे, यासाठी बाजारात अनेक ग्लुकोमीटर उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने ते घरी बसून तपासले जाऊ शकतात. असे केल्याने तुम्ही शुगर स्पाइक टाळाल

न्याहारी हे कोणत्याही दिवसाचे पहिले जेवण आहे, सर्वप्रथम न्याहारी टाळण्याचा विचार करु नका आणि सकाळी फक्त आरोग्यदायी गोष्टी खा. तेलकट पदार्थ आणि गोड पदार्थांना अजिबात प्राधान्य देऊ नका नाहीतर रक्तातील ग्लुकोजची पातळी (Blood Sugar Level) वाढेल.

मधुमेहाच्या (Diabetes) आजारामुळे पायांची समस्याही वाढू शकते, त्यामुळे सकाळी उठून पाय पाहणे गरजेचे आहे. पायाचा किंवा नखांचा रंग बदलल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे फोड किंवा जखमा दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.ZEE 24 TAAS  याची पुष्टी करत नाही.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link