Low Sperm Count: हस्तमैथुन केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? काय आहेत सत्य... जाणून घ्या
हस्तमैथुन केल्यानं खरंच पुरूषांच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होते का यावर अनेकांना प्रश्न पडतो.
Masterbation Side Effect: हस्तमैथुन करणे ही पूर्णपणे मजेशीर बाब असून त्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत नाही. संभोगादरम्यान पुरूष जे शुक्राणू किंवा वीर्य सोडतात त्यात कमी शुक्राणू असतात. याला ऑलिगोस्पर्मिया असं म्हणतात. पुरूषांमधील स्पर्म महिलांच्या अंडाशयामध्ये जातात. जेव्हा शुक्राणूंची संख्या सामान्यापेक्षा कमी असतं तेव्हा पुरूषांचे अंड पेनिट्रेट करू शकत नाहीत त्यामुळे पुरूषांमध्ये वंध्यत्नव येते.
कधीकधी रात्री झोपल्याने पुरुषांच्या जननेंद्रियात ताण येऊ शकतो आणि त्यानंतर किंवा त्याशिवाय वीर्य बाहेर येऊ शकते. या प्रक्रियेला Nightfall असे संबोधले जाते. हे अत्यंत नैसर्गिक असून सर्वसाधारण प्रक्रिया आहे.
हस्तमैथूनाकडे फक्त मजा म्हणूनच पाहिले जाते त्यानं तुमच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होत नाही. परंतु हस्तमैथून करताना योग्य तऱ्हेची आरोग्यपुर्ण काळजीही घेणे गरजेचे आहे.
असे म्हटले जाते की हस्तमैथुन करताना वाढलेली नखं अथवा धारधार वस्तूचा वापर करू नका. तुम्हाला हस्तमैथुन करताना इजा होईल अथवा दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी. एखाद्याच्या मर्जीविरूद्ध त्या व्यक्तीसमोर हस्तमैथून करणं गुन्हा आहे.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)