Vastu Tips: नकळतही कोणाकडून मोफत घेऊ नका `या` गोष्टी; पैशांसाठी वणवण फिरावं लागेल

Thu, 17 Nov 2022-2:42 pm,

मीठ - वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार मीठाचा संबंध शनिशी असतो. त्यामुळं जर तुम्ही कोणाकडून मीठ मोफत घेतलं, तर कर्जाचा डोंगर वाढेल; आजारपणांचा विळखा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना बसेल. 

सुई- कधीच कोणाकडून शिवणाची सुई मोफत घेऊ नका. यामुळं तुमच्या वैवाहिक आणि प्रेमाच्या नात्यांवर वाईट परिणाम होईल. सोबतच आर्थिक नुकसानही वाढेल. लक्ष्मीची अवकृपा होईल. 

रुमाल- असं म्हणतात की कोणाकडूनही रुमाल घेणं मोठ्या नुकसानाचं कारण ठरु शकतं. मोफत रुमाल घेतल्यास ज्या व्यक्तीकडून तुम्ही तो घेता त्याच्याशी खटकेही उडण्याची शक्यता असते. 

लोखंड- लोखंडी वस्तू, भांडी कधीच फुकटात घेऊ नका. पत्रिकेत शनी अशुभ असल्यास शनिशी संबंधि वस्तूंचं दान करा. जेणेकरुन तुमच्यावरची संकटं टळतील. 

 

तेल- शनिपीडा दूर करण्यासाठी तेल दान करतात. पण तेल कोणाकडूनही मोफत घेणं मोठी संकटं ओढावणारं ठरू शकतं. असं केल्यास तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फटकाही बसू शकतो. इतकंच नाही तर, पैशांसाठी दारोदार भटकण्याची वेळही येऊ शकते. 

(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link