Vegetable Peel Benefits: चुकूनही कचऱ्यात फेकू नका `या` 5 भाज्यांच्या साली, आरोग्यासाठी वरदान आहेत

Mansi kshirsagar Fri, 07 Jun 2024-3:03 pm,

उत्तम आरोग्यासाठी भाज्यांचा सालांचे सेवन करणेही खूप गरजे आहे. कारलं, बटाटा, वांगे आणि गाजर यासारख्या भाज्यांच्या सालांमध्ये पोषकतत्वे असतात. या भाज्यांच्या सालांमध्ये व्हिटॅमिन, पॉलीफेनॉल्ससारखे पोषकतत्वे असतात. ज्यामुळं आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अशा कोणत्या 5 भाज्या आहेत ते जाणून घ्या. 

 

 

बटाट्यांच्या सालांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटेशियम, मॅग्निशियम आणि आयर्न आढळतात. त्या व्यतिरिक्त बटाट्याच्या सालांमध्ये फायबर आढळतात. जे बद्धकोष्ठतेवर मात करते. 

 

जर गाजराची सालं काढून खाल्ले तर त्याचे फायदे मिळत नाहीत. यात बीटा-कॅरोटीननावाचे गुणधर्म असतात. जे शरीरात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करतात. त्या व्यतिरिक्त त्यात फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. ज्यात अँटी इफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. 

वांग्याच्या सालांमध्ये व्हिटॅमिन के, अँटीऑक्सीडेंट, पोटेशियम आणि फायबरचे मात्रा अधिक असते. वांग्याच्या सालांमध्ये अँटी ऑक्सीडेंट असतात. जे शरीराच्या विभिन्न आजारांपासून आराम देते. वांग्याच्या सालांमध्ये पॉलीफेनॉल्स आढळते. ज्यामुळं कँन्सरचा धोका कमी होतो. 

 

दुधीच्या भाजीसोबत दुधीचे सालदेखील खूप फायदेशीर असतात. यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अनेक अँटी ऑक्सीडेट्स आढळतात. याचे सेवन केल्यास पोटासाठीदेखील फायदेशीर असतात.

कारल्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. कारल्याच्या सालांमध्ये व्हिटॅमीन सी आणि अन्य अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे शरीरात फ्री रेडिकल्स तयार करण्यापासून रोखते. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link