आज 40शीत प्रवेश करणारी लारा दत्ता `या` प्रश्नाचं उत्तर देऊन झाली होती Miss Universe

Mon, 16 Apr 2018-11:42 am,

आज लारा दत्त 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. 16 एप्रिल 1978 साली लाराचा जान्म गाजियाबादमध्ये झाला. 2000 साली लाराने 'मिस युनिवर्स'चा किताब पटकावला. लारा दत्तला पद्मश्री आणि पद्मभूषण यासारख्या राष्ट्रीय पुरस्कारांंनी गौरवण्यात आले आहे. 

सुष्‍मिता सेन नंंतर भारताकडे 'मिस युनिव्हर्स'चा मान परत आणण्याची किमया लारा दत्तने केली. या स्पर्धे दरम्यान लाराला विचारण्यात आलेला प्रश्न 'ट्रिकी' होता. 2000 साली सौंदर्य स्पर्धांंना विरोध करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेला प्रश्न होता, मिस युनिवर्स स्पर्धेला विरोध करण्यात आला आहे, यामध्ये महिलांचा अपमान होतो असा दावा आहे. तू विरोधकांंना कसं समजावशील की ते चूकीचे आहेत. 

 

 

या प्रश्नावर उत्तर देताना लारा म्हणाली होती, मिस युनिवर्ससारख्या प्रतिक्रिया नेहमी तरूणींना वाव  देतात, त्यांंना मंच उपलब्ध करून देतात. या मंचामुळे तरूणींना पसंतीनुसार त्यांंची मतं ठाम आणि मोकळ्याप्रमाणे मांंडता येऊ शकते. यामुळे महिला स्वतंत्र, स्वावलंबी होतात. 

लाराने  2003 साली अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.  या चित्रपटासाठी लाराला फिल्म फेयरद्वारा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल लाराला  2008 साली राजीव गांधी पुरस्‍कार मिळाला आहे. 

2010 साली लारा दत्त टेनिसपटू महेश भूपतीसोबत विवाहबद्ध झाली.  

(फोटो साभार: @larabhupathi)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link