रात्री झोपण्यापूर्वी दूधात हा एक पदार्थ टाकून प्या; सकाळी पोट झटपट होईल साफ

Mansi kshirsagar Thu, 08 Aug 2024-1:31 pm,

आजच्या काळात अनेक जणांमध्ये बद्धकोष्ठता ही समस्या तीव्रतेने दिसून येते. यामागे अनेक कारणे आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही घरातच उपचार करु शकतात. 

वेळी अवेळी जेवणे, ऑफिसातील कामाच्या वेळा, झोपेची वेळ याचा परिणाम नकळत आरोग्यावर होत असतो. तसंच, शरीराचे रुटिन बिघडल्यामुळंही बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. 

बद्धकोष्ठतेमुळं पोट साफ होत नाही. जर पोट साफ झालं नाहीतर संपूर्ण दिवस खराब जातो. त्याचबरोबर पोट फुगणं, पोटदुखी, शौचास साफ न होणं यासारखे त्रास होऊ लागतात. 

पोट साफ होण्यासाठी एक घरगुती उपाय नक्की करुन पाहा. कोमट दुधात फक्त एक गोष्ट मिसळून प्यायल्यास सकाळी झटक्यात पोट साफ होईल. 

बद्धकोष्ठतेवर वेळीच उपचार केले नाही तर त्यामुळं अन्य समस्यांही वाढतात. यावर तोडगा काढण्यासाठी रात्री कोमट दूधात हा पदार्थ टाकून प्या. 

रात्री एक कप दूध गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा त्यानंतर त्यात एक तमालपत्र टाका. दूध चांगले उकळून घ्या.

दूध कोमट झाल्यानंतर झोपण्यापूर्वी प्या. या उपायाने सकाळी पोट साफ होईल आणि तुमची चिडचिडदेखील होणार नाही. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link