आधार-पॅन कार्ड लिंक करताना अडचण येतेय? `या` गोष्टी एकदा तपासा..

Surendra Gangan Fri, 30 Jun 2023-3:24 pm,

पॅन-आधार कार्डला लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस...लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द होणार.

पॅनला आधारशी लिंक करताना या काही कारणांमुळे अडचण येऊ शकते. डेमोग्राफिक माहिती जुळत नाही. दुसरे म्हणजे जन्मतारीख वेगळी असणे. तसेच लिंग बदल. (उदा. पुरुष, महिला)

स्टेप 1 - तुमची पॅन आणि आधार माहिती वेगळी असल्यामुळे तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल, तर आधी पॅन कार्डमधील माहिती अपडेट करा. यासाठी तुम्ही सर्वप्रथम onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकला भेट देऊन तुमची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.

स्टेप 2 - त्यानंतर UTIITSL pan.utiitsl.com वर जा. यानंतर, ssup.uidai.gov.in/web/guests/update या लिंकवर जाऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करा.

स्टेप  3 - आता आधार आणि पॅन दोन्हीमध्ये माहिती अपडेट केली गेली आहे, तर तुम्हाला ती पुन्हा लिंक करावी लागेल. यासाठी तुम्हाला eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकवर जावे लागेल आणि पुढील प्रक्रियेचे अनुसरण करुन तुम्ही ते करु शकता.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link