सेलिब्रिटी नव्हे, देशाच्या बहुचर्चित IAS अधिकाऱ्यांचे पत्नीसोबतचे Romantic फोटो व्हायरल
खऱ्या अर्थानं झगमगणाऱ्या विश्वातील सेलिब्रिटींनाही टक्कर देतील. यातलंच एक नाव म्हणजे आयएएस अधिकारी अतहर आमिर खान. (IAS Athar Amir Khan) अतहर यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टर मेहरीन काझीशी लग्न केलं. त्या क्षणापासून त्यांचे आणि मेहरीनचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
नुकतेच या जोडीचे काही रोमँटिक फोटो समोर आले आहेत. खुद्द अतहर यांनीच हे फोटो शेअर केल्याचं कळत आहे. ज्यामध्ये त्यांनी माझं मन आणि आयुष्य फक्त तुझंच आहे, असं कॅप्शन लिहित पत्नीवरील प्रेम व्यक्त केलं.
अतहर आणि मेहरीन या फोटोमध्ये अगदीच Casual लूकमध्ये दिसत आहेत. अतहर यांच्या पत्नीनं घातलेला बेबी पिंक रंगाचा कुर्ता तिच्या सौंदर्यात भर टाकताना दिसत आहे.
लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या, त्या क्षणापासूनच या जोडीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. निमित्त ठरत होतं ते म्हणजे या दोघांचं कर्तृत्त्वं आणि त्यांचं रुप.
अतहर यांच्यावर तर असंख्य तरुणी आजही भाळल्या आहेत. आता असं नेमकं का हे तुम्हाला त्यांचे फोटो पाहून सहजच लक्षात येईल. (सर्व छायाचित्र- अतहर आमिर खान/ Instagram)