26 जानेवारीपेक्षा वेगळी असते 15 ऑगस्टची झेंडा फडकावण्याची पद्धत, तुम्हाला माहितीय का?

Pravin Dabholkar Tue, 13 Aug 2024-8:10 pm,

राष्ट्रीय ध्वज आपला देश आणि गौरवाचे प्रतिक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी झेंडा फडकावला जातो.  पण या दोन दिवसातील झेंडा फडकावण्यात काय फरक आहे? हे अनेकांना माहिती नसते.

स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 

स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची आठवण काढली जाते. आता स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु झाली आहे.

पण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या 2 दिवसात केल्या जाणाऱ्या झेंडा वंदनातील फरक समजून घेऊया. 

15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाला राष्ट्रीय ध्वज वर खेचला जातो आणि मग फडकावला जातो. ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी ब्रिटिश सरकारने त्यांचा झेंडा उतरवला आणि तिरंगा वर चढवला. 

यामुळे दरवर्षी 15 ऑगस्टला तिरंगा वर खेचला जातो आणि मग फडकावला जातो. याला ध्वजारोहण असे म्हणतात. 

26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वज वर बांधलेला असतो. तो केवळ फडकावला जातो. त्यामुळे त्याला ध्वजारोहण नव्हे तर ध्वज फडकावणे असे म्हणतात.

15 ऑगस्टला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान ध्वजारोहण करतात. 

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुख्य कार्यक्रम राजपथवर असतो.तिथे राष्ट्रपती तिरंगा फडकावून त्याला वंदन करतात. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link