Independence Day 2024 : रं मर्दा... इथं प्रत्येक कुटुंबात एक सैनिक; साताऱ्यातील `या` गावाचं नाव काय?

Thu, 08 Aug 2024-1:28 pm,

'दूध मांगोगे तो खीर देंगे, मगर कश्मीर मांगोगे तो चीर देंगे', पाकिस्तानला उद्देशून असलेला हा संवाद जवळपास सर्वच भारतीयांना माहित आहे. 1947 ला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष लोटली  तरी भारत- पाक सीमारेषेतील तणाव कमी झालेला नाही. 

 

1971 चं युद्ध , कारगिल युद्ध असो किंवा मग मुंबईवर पाकने केलेला 26/11 चा हल्ला आणि पुलवामाचा हल्ला पाकच्या कुरघोड्यांना भारतीय जवानांनी सडेत्तोड उत्तर दिलं. 

 

भारताचा ध्वज हा हवेने नाही तर सैनिकांच्या श्वासांमुळे फडकतो असं म्हणतात. अर्थात हे काही चुकीचं नाही. आज देशाचा प्रत्येक नागरीक लोकशाहीचा हक्क गाजवतो ते सीमेवर पाहारा देणाऱ्या वीर जवानांमुळे. 

सीमेवर लढणारा जवान आणि शेतात राबाणारा बळीराजा यांचा वारसा भारताला लाभलेला आहे. महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे शेतीची आणि सैन्यात जाण्याची परंपरा आहे. 

सातारा जिल्हा हा शेतीने समृद्ध आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यातून सैन्यात भरती होण्याचं प्रमाण देखील जास्त आहे. 

साताऱ्यातील अपशिंगे गाव आजतागायत दोन्ही परंपरा जपत आहे. या गावाला अपशिंगे मिलिटरी असं म्हटलं जातं. 

 

कारगिल युद्धात या गावच्या 80 जवानांनी देशासाठी वीरमरण पत्कारलं. या गावाला सैन्याची पुर्वापार परंपरा चालत आली आहे.  म्हणूनच या गावाला अपशिंगे मिलिटरी असं म्हणतात. 

पहिलं महायुद्ध, 1971 भारत पाक युद्ध किंवा मग कारगील युद्ध असो या सगळ्यात महत्त्वाच्या लढायांमध्ये अपशिंगे गावच्या वीर जवानांनी मोलाची कामगिरी बजावली होती. 

या गावात प्रत्येक कुटुंबातील किमान एक जण तरी सैन्यात असतोच असतो. महाराष्ट्रातून नौसेना, वायुसेना, बीएसएफ, सीआरपीएफ आणि अन्य सुरक्षा या वेगवेगळ्या सुरक्षा दलात रुजु आहेत. 

जसं एखाद्या वकिलाचा मुलगा वकिल होतो अगदी तसचं अपशिंगे गावात सैनिकाचा मुलगा देखील सैन्यातच भर्ती होतो. फक्त पुरुषच नाही तर देखील तेवढ्याच खंबीर आहेत. कारगीलच्या युद्धात कोणी मुलगा कोणी पती कोणी वडील तर कोणी आपला भाऊ गमावला,पण या स्त्रियांनी हार न मानली नाही. आजही या स्त्रिया आपल्या कुटुंबाची सदस्याची शौर्यगाथा अभिमानाने सांगतात. 

खरंतर गावातील मुलांना मिलिटरीचं प्रशिक्षण घेण्यासाठी सातारा किंवा पुण्यात जावं लागत. पण  अपशिंगे गावात  लहानपणापासून देशसेवेचं बाळकडू पाजलं जातं. 

अपशिंगे गावातले अनेक वीर जवान देशसेवेचं कर्तव्य बजावताना शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ गावात स्मारक देखील आहे. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link