Ind vs Eng 3rd Test: तिसऱ्या कसोटीआधी जाणून घ्या मोटेरा स्टेडियमचं वैशिष्ट्यं

Wed, 17 Feb 2021-8:32 pm,

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील मोटेरा मैदानावर होणार आहे. हा सामना रोमांचक असणार आहे. याचं कारण भारत आणि इंग्लंडने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी घेतली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामने अत्यंत जोखमीचे असणार आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी मोटेरा स्टेडियम सज्ज झालं आहे. या स्टेडियमचं वैशिट्यं काय जाणून घ्या

हे स्टेडियम 12 नोव्हेंबर 1983 मध्ये उभारण्यात आलं. गुजरातच्या अहमदाबाद इथे हे स्टेडियम आहे. जगातील सर्वात मोठं स्टेडियम अशी याची ओळख आहे. याशिवाय इथे 76 वातानुकूलित कॉर्पोरेट बॉक्स आहेत. हे स्टेडियम 63 एकर जागेत उभारण्यात आलं आहे. 

24 फेब्रुवारीपासून इथे तिसरा डे-नाइट कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यासाठी खास एलईडी लाईटची सुविधा करण्यात आली आहे. तर खेळाडूंसाठी इनडोर आणि आऊटडोर सरावासाठी सुविधा देखील देण्यात आली आहे. 

 

 

 

 

या मैदानात 11 पिच आहेत. त्यासाठी खास लाल आणि काळ्या मातीचा वापर देखील करण्यात आला आहे. खेळाडूंसाठी खास ड्रेसिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. चार ड्रेसिंगरूम असणारं हे जगातील पहिलं स्टेडियम आहे. याशिवाय इथल्या रूममध्ये जिम देखील उभारण्यात आल्या आहेत. 

मागच्या वर्षी 24 फेब्रुवारीला या स्टेडियममध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले होते. त्यांनी या स्टेडियममधून लोकांना संबोधित केलं होतं. 2014 नंतर पहिल्यांदाच या स्टेडियमवर डे-नाइट सामना रंगणार आहे. 

मागच्या वर्षी 24 फेब्रुवारीला या स्टेडियममध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले होते. त्यांनी या स्टेडियममधून लोकांना संबोधित केलं होतं. 2014 नंतर पहिल्यांदाच या स्टेडियमवर डे-नाइट सामना रंगणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link