मुंबईतल्या `या` 3 स्थानकांचा होणार कायापालट, काय मिळणार सुविधा?

Pravin Dabholkar Tue, 17 Oct 2023-1:44 pm,

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 15 स्थानकांचे विकास काम रेल्वेने हाती घेतले आहे. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत हा विकास केला जातोय.

परळ, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भायखळा रेल्वे स्थानकांचे पुर्निविकास काम सुरु झाले आहे. हे काम लवकरता लवकर पूर्ण करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने ठेवले आहे.

परळसाठी 1941 कोटी, विक्रोळीसाठी 19.16 कोटी, कांजूरमार्गसाठी 27.01 कोटी आणि भायखळासाठी 35.52 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. 

या योजनेत देशभरातील एक हजार 275 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. 

यामध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्टॅंडर्ड रोड, चिंचपोकळी,भायखळा, परळ, माटुंगा, वडाळा रोड, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुब्रा, दिवा, इगतपुरी, शहाड आणि टिटवाळा स्थानकाचा पुर्नविकास केला जाणार आहे. 

परळ स्थानकांवर रुग्ण प्रवाशांची संख्या मोठी आहे.  येथे दररोज साधारण 40 हजार प्रवासी या स्थानकावरून ये-जा करतात. यासाठी पहिल्या टप्यातच परळ स्थानकाचा पुर्नविकासचे काम रेल्वेने हाती घेतले आहे.

फलाटांवर लिफ्ट, सरकते जिने, सिवेज ट्रीटमेंट प्लांटच्या सुविधेसोबत नवीन शौचालय, सर्क्युलेटिंग एरिया आणि ट्रॅफिक प्लॅन सुधारणे, स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा, स्थानकांवर प्रकाश व्यवस्था सुधारली जाणार आहे.

यासोबतच नवे आधुनिक दिशादर्शक फलक, अद्ययावत सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा, बुकिंग ऑफिस आणि अन्य कार्यालयाचे नूतनीकरण आणि दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा दिल्या जाणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link