तुमच्या रेल्वे सीटवर कोणी जबरदस्ती बसलं तर काय करायच? जाणून घ्या
Indian Railway: भारतातील सर्वात मोठी लोकसंख्या दररोज रेल्वेने प्रवास करते. लांबच्या पल्ल्यासाठी रेल्वे प्रवास स्वस्त आणि सोयीचा पडतो.
लांबचा प्रवास करताना बसायला जागा मिळाली नाही तर खूप त्रास सहन करावा लागतो.
आपले रिझर्वेशन असतानादेखील भलतेच कोणी आपल्या जागेवर येऊन बसतात. वारंवार सांगूनही ते हटायला मागत नाहीत, तेव्हा खूप चिडचिड होते.
असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.पण अशावेळी नक्की काय करायचं? हे आपल्याला माहिती नसते. अशावेळी समोरच्याशी कोणतेही भांडण न करता प्रकरण मिटवू शकता. कसे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रेल्वेकडे तक्रार करावी लागेल. सीटच्या समस्येबद्दल तक्रार करण्यासाठी तुमच्या मोबाइल फोनमध्ये Rail Madad नावाचे अॅप्लिकेशन डाउनलोड करा.
यावर तुमचा मोबाईल नंबर टाकून खाते तयार करू शकता.
तुमच्या कन्फर्म तिकिटाचा पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. यानंतर, या अॅप्लिकेशनमध्ये तुमच्यासमोर तक्रारीचा पर्याय दिसेल.
ज्यावर क्लिक करून तुम्ही घटनेची माहिती तसेच तक्रारीचा प्रकार निवडा.घटनेबद्दल तपशीलवार माहिती भारतीय रेल्वेला पाठवू शकता.
तुम्हांला इतकं काही करायचं नसेल तर उत्तम पर्याय म्हणजे कोचमध्ये उपस्थित असलेल्या TTE शी संपर्क करा.