तिकिट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेच्या `या` कोडवरुन लक्षात ठेवा
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळं कधी कधी तिकिट मिळवण्यासाठीदेखील खूप प्रयत्न करावा लागतो. कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी खूप वाट पाहावी लागते.
रेल्वेचे काही कोड असतात ज्यामुळं तुमचं वेटिंग लिस्टमध्ये असलेले तिकिट कन्फर्म होईल का? हे तुम्ही जाणून घेऊ शकता. वेटिंग तिकिटवर लिहलेले हे कोड नेमके काय आहेत. हे सर्व जाणून घेऊया.
RAC म्हणजे तुम्हाला तिकिट मिळालं आहे. तुम्ही प्रवास करु शकता मात्र, तुमची सीट दोघांमध्ये वाटली जाईल. तुम्ही सीटवर बसू शकता मात्र स्लीपर कोच मिळू शकत नाही
GNWL. याचा अर्थ जनरल वेटिंग लिस्ट. GNWL कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक असते. कारण ज्या स्थानकातून ट्रेन सुटणार आहे तिथे सर्वाधिक बर्थ असतात.
प्रवाशांना वेटिंग तिकिट तेव्हा दिलं जातं. जेव्हा तिकिट पहिल्या व शेवटच्या स्थानकांव्यतिरिक्त मार्गातील आसपासच्या स्थानकांसाठी बुक केले जाते. GNWLच्या तुलनेत हे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता थोडी कमी असते.
ट्रेनमध्ये मधल्याच एखाद्या स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांना हे तिकिट दिले जाते. हे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता खूप कमी असते.
तात्काळ बुकिंगमध्ये कन्फर्म तिकिट न मिळणाऱ्या प्रवाशांना हे तिकिट दिले जाते. हे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता नसतेच
ट्रेनच्या मूळ स्थानकावरून जवळच्या स्थानकांवर तिकीट बुक केले जाते. अशी तिकिटे कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे.