ग्रॅज्युएटही न झालेल्या मनू भाकरची किती आहे संपत्ती? सर्वकाही जाणून घ्या
मनू भाकरने पॅरीस ऑलिम्पिक 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून इतिहास रचलाय. या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं मेडल आहे.
मनूचे हे दुसरे ऑलिम्पिक आहे. 2020 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्यात तिला यश आलं नव्हतं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मनुचे पिस्टल खराब झाले होते.
22 वर्षीय मनू भाकर हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावची रहिवाशी आहे. तिची आई शाळेत शिकवते तर वडील मरिन इंजिनीअर आहेत.
मनुने झज्जर विद्यापीठ पब्लिक स्कूलमधून सिनिअर सेकेंडरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्समधून पदवी पूर्ण करतेय.
विविध मीडिया रिपोर्टनुसार मनू भाकरचे नेटवर्थ 12 कोटी रुपये इतके आहे. तिच्याकडे असलेली संपत्तीची रक्कम ही स्पॉन्सर्सकडून मिळालेली आहे.
मनूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल्स जिंकले आहेत. यानंतर हरियाणा सरकारने तिला 2 कोटी रुपये दिले होते. 2017 च्या राष्ट्रीय शूटींग चॅम्पियन्सशिपमध्ये तिने ऑलिम्पियन आणि माजी वर्ल्ड नंबर 1 असलेल्या हीना सिद्धूचा रेकॉर्ड तोडला होता.
रिपोर्टनुसार, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी मनू भाकरवर केंद्र सरकारने 1.7 कोटी रुपये खर्च केले होते.
सुरुवातीच्या काळात मनू भाकर हिच्याकडे पिस्टलदेखील नव्हते. शूटींग व्यतिरिक्त मनु भाकरने बॉक्सिंग, किक बॉक्सिंग आणि क्रिकेट सारख्या इतर खेळांमध्येही नशिब आजमावले आहे. तिला मार्शल आर्टदेखील येते.