Instagram च्या `या` धोकादायक ट्रेंडमुळे होतील तुमचा पर्सनल डाटा लीक, चूक करूच नका!

Saurabh Talekar Fri, 29 Dec 2023-10:41 pm,

अलीकडे इन्स्टाग्रामवर Get To Know Me ट्रेंड सुरू आहे. कदाचित तुम्ही हे कधी लक्षात घेतलं नसेल, पण ट्रेंड धोकादायक ठरू शकतो. 

इन्स्टाग्रामवरचा ट्रेंड बघितला तर प्रश्न-उत्तराचा सोपा फॉरमॅट वाटेल, पण त्याचा तुम्हाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांनीही लोकांना याबाबत सावध केले आहे. वास्तविक, या ट्रेंडमध्ये तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, ज्याचा अंदाज इतरांना लावयचा असतो.

या उत्तरांच्या आधारे पुढची व्यक्ती तुम्हाला किती ओळखते हे ठरवले जाते. गेट टू नो मी ट्रेंडमध्ये सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जातात.

यामध्ये तुमचे वय, उंची, वाढदिवस, टॅटू, आवडता हंगाम, कलाकार, खाणे आणि काय काय आवडतं यांचा समावेश होतो.

या माध्यमातून तुमचं खातं रिसेट करताना वापरले जाणारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे तुमचा डाटा लीक होण्याची शक्यता असते.

तुम्हीही असा कोणताही इन्स्टाग्राम ट्रेंड फॉलो करत असाल तर तुम्ही सावध व्हा. तुम्ही दिलेले प्रश्न तुम्हाला अडचणीत टाकू शकतात.

अशा प्रश्नांच्या आधारे तुमचं सोशल मीडिया अकाऊंटच काय तर तुमचं बॅक अकाऊंट देखील खाली होण्याची शक्यता असते. त्यामुळे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांनी सावध राहण्याचा सल्ला दिलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link