IPL 2023 साठी Jio चे खास Plans! स्वस्तात रोज मिळणार 3 GB डेटा अन् बरंच काही; पाहा Details

Tue, 28 Mar 2023-4:19 pm,

जिओने 3 खास प्लॅन 31 मार्चपासून सुरु होणाऱ्या IPL 2023 च्या दृष्टीने लॉन्च केले असून जिओ सिनेमावरुन हे सामने थेट लाइव्ह पाहता येणार आहेत. 

क्रिकेट चाहत्यांची संख्या आणि आयपीएलची क्रेझ पाहता जिओने 3 खास प्लॅन लॉन्च केलेत. विशेष म्हणजे या प्लॅन्समध्ये 40 जीबी डेटा मोफत दिला जाणार आहे. म्हणजेच यंदा नेटवर्क इश्यू किंवा व्हिडीओ लोडिंगसारख्या समस्यांशिवाय सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

जिओने लॉन्च केलेला सर्वात महागडा प्लॅन हा 999 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना रोज 3 जीबी पर्यंत डेटा मोफत दिला जाईल. तसेच यावर अनलिमिटेड मोफत कॉलिंगची सेवा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे युझर्सला 241 रुपयांचे व्हाऊचर्स मोफत दिले जाणार आहेत, ज्यात 40 जीबी डेटाचा समावेश आहे. हा प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे.

जिओच्या या नव्या प्लॅनमधील दुसऱ्या क्रमांकाचा प्लॅन हा 399 रुपयांचा आहे. यामध्ये रोज 3 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार असून यात 61 रुपयांच्या मोफत व्हाऊचर्सचा समावेश आहे. ज्यात अतिरिक्त 6 जीबी डेटाचा लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.

जिओच्या 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये केवळ 14 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. यात दर दिवशी 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जिओ युझर्सला 2 जीबी डेटा मोफत दिला जाईल.

डेटा अॅड ऑन फ्लॅन्सचीही घोषणा जीओने केली आहे. यातही 3 प्लॅन्स असून ते 222 रुपये, 444 रुपये आणि 667 रुपयांचा पर्याय आहे. 222 च्या प्लॅनमध्ये 50 जीबी डेटा मिळेल. 444 च्या प्लॅनमध्ये 60 दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत 100 जीबी डेटा मिळेल. तर 667 च्या प्लॅनमध्ये 150 जीबी डेटा 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत मिळेल.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जिओचे हे डेटा प्लॅन 24 मार्चपासून बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळेच क्रिकेट चाहत्यांना आपल्या मोबाईलवर आयपीएलचा आनंद घ्यायचा असेल तर हे प्लॅन्स उत्तम पर्याय ठरु शकतात. आयपीएल संपेपर्यंत यापैकी मोठ्या प्लॅन्सची व्हॅलिडीटी कायम राहणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link