IPL 2024 : ना रोहित ना विराट, टीम इंडियाचा `हा` स्टार खेळाडू कमवतो क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे

Saurabh Talekar Wed, 24 Apr 2024-4:29 pm,

लखनऊ सुपर जायएन्ट्सचा कॅप्टन केएल राहुल क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे कमवतो. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी आणि आयपीएलमधून मिळणारे 17 कोटी राहुलला मिळतात.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा बीसीसीआयकडून 7 कोटी वर्षाला घेतो. तर त्या आयपीएलमधून 16 कोटी वर्षाला मिळतात.

या यादीत तिसऱ्या स्थानी येतो ऋषभ पंत... ऋषभ देखील रोहितप्रमाणे बीसीसीआयकडून 7 कोटी आणि आयपीलएमधून 16 कोटी कमावतो.

चेन्नई सुपर किंग्जचा सुपरस्टार रविंद्र जडेजाला आयपीएलमधून 16 कोटी मिळतात. तर बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी जड्डूला मिळतात.

 

विराट कोहलीचा देखील या यादीत समावेश आहे. विराट कोहली या यादीत पाचव्या स्थानी येतो. विराट बीसीसीआयचे 7 कोटी अन् आयपीएलमधून 15.25 कोटी कमावतो.

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी अन् आयपीएलमधून 15 कोटी घेतो.

जसप्रीत बुमराह देखील या यादीत आहे. बुमराहला मुंबईकडून खेळण्यासाठी 12 कोटी मिळतात. तर बीसीसीआय टीम इंडियाकडून खेळण्यासाठी त्याला 7 कोटी मोजते.

शुभमन गिल याला बीसीसीआयकडून खेळण्यासाठी 5 कोटी दिले जातात. तर आयपीएलमधून त्याला 8 कोटी मिळतात.

सूर्यकुमार यादव याला देखील बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमधून 5 कोटी दिले जातात. तर आयपीएलमधून सूर्याला 8 कोटी मिळतात.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link