जॉनी लिव्हरमुळे सुपरस्टार्सना का वाटायचं असुरक्षित? स्वत:च केला खुलासा

Mon, 14 Aug 2023-8:00 am,

जॉनी लिव्हर हे आपल्या सगळ्यांचेच लाडके अभिनेते आहे. त्यांच्या विनोदाचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्याचा मागील वर्षी आलेला रोहित शेट्टीचा 'सर्कस' हा चित्रपट विशेष गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आज जॉनी लिव्हर यांचा वाढदिवस आहे. 

जॉनी यांचा इथपर्यतचा प्रवास हा सोप्पा नव्हता. त्यांनी नुकत्याच ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की त्यांना आता काम का मिळत नाहीये यामागील कारण त्यांनी शेअर केले होते. 

ते म्हणाले होते की, ''अनेकदा बॉलिवूड हिरोंना भिती वाटायची आणि माझे सीन्स डिलिट केले जायचे. त्यांना हे कळलं होतं की माझ्या सीन्सना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात आणि त्यामुळे त्यांना कमालीची भिती वाटायची.'' 

ते पुढे म्हणाले की, ''त्यांनी लेखकांनाच सांगायला सुरूवात केली की आमच्यासाठी कॉमेडी सीन्स लिहून द्या. आणि लेखकही ते करायचे. त्यामुळे माझा रोल मात्र फार लहान होत जायचा. तेच तुम्ही आता पाहताय. कॉमेडी आता संपलीये.''

यावेळी ते असंही म्हणाले होते की, ''पुर्वी कॉमेडीला मान होता. त्यांना फार सकारात्मक प्रतिसाद त्यांच्या सीनसाठीही मिळायचा परंतु आता असं पाहायाला मिळत नाही.'' 

जॉनी लिव्हर यांची दोन्ही मुलंही या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचीही अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link