भाजपकडून खऱ्याखुऱ्या राजेसाहेबांना लोकसभेचं तिकीट; कुठे आहे त्यांचं साम्राज्य?

Thu, 14 Mar 2024-5:44 pm,

देशातील राजकीय वर्तुळामध्ये अनेक राजघराण्यांच्या व्यक्तींनी प्रवेश केल्याचं आजवर पाहायला मिळालं आहे. त्यात आता आणखी एका कुटुंबांचं नाव जोडलं गेलं आहे. हे नाव आहे दक्षिण भारतातील वाडियार कुटुंबाचं. 17 व्या शतकामध्ये वाडियार राजवटीच्या कार्यकाळात म्हैसूरचा भाग हिंदू राज्य म्हणून नावारुपास आला होता. 

1399 ते 1947 पर्यंत इथं वाडियार राजवट होती असंही सांगितलं जातं. 18 व्या शतकरामध्ये हैदर अली आणि टीपू सुल्तान यांनीही म्हैसूर प्रांतावर राज्य केलं. अशा या म्हैसूरच्या राजघराण्यातील यदुवीर कृष्णदत्त वाडियार यांना भाजपनं लोकसभेचं तिकीट दिलं आहे. कर्नाटकात आजही राजघराण्यांना अनन्यसाधारण महत्त्वं दिलं जातं. 

याच प्रांतातील म्हैसूर कोडागू लोकसभेच्या जागेवर यापूर्वी भाजपचेच प्रताप सिम्हा नियुक्त होते. पण, यंदा मात्र त्यांना डावलून पक्षानं थेट राजघराण्यातील व्यक्तीलाच तिकीट दिलं आहे. सिन्हा हे तेच खासदार होते, ज्यांच्या पासवर संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून अज्ञातांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण केली होती. ज्यामुळं यंदा त्यांना संधी मिळाली नाही. 

 

राहिला मुद्दा राजेसाहेबांच्या उमेदवारीचा, तर यदुवीर कृष्णदत्त वाडियार 31 वर्षांचे असून, 2015 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला होता. मॅसाच्युट्स विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी आणि अर्थशास्त्र अशा विषयांमध्ये पदवपी शिक्षण पूर्ण केलं आहे. अमेरिकेत त्यांचं शिक्षण झालं असून, गिटार आणि वीणा वादनावर त्यांचं विशेष प्रेम. 

 

वाडियार राजवंशाचे अखेरचे वंशज श्रीकांतदत्ता नरसिम्हाराजा वाडियार यांची पत्नी प्रमोदा देवी वाडियार यांनी अपत्य नसल्यामुळं यदुवीर गोपाळ राज यांना दत्तक घेतलं होतं. ज्यानंतर त्यांचं नाव यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार असं ठेवण्यात आलं. 

राजस्थानातील डूंगरपुर शाही घराण्याशी नातं असणाऱ्या तृशिखा कुमारी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तृशिखा यांचे वडिलही भाजपकडून राज्यसभेचे खासदार होते अशी माहिती मिळते. म्हैसूरच्या राजघराण्य़ासाठी राजकारण नवं नाही. 

मुळात दक्षिण कर्नाटकात राजघराण्याला प्रचंड महत्त्वं असून नागरिकांवरही त्यांचा मोठा प्रभाव आहे. जनसामान्यांकडून राजघराण्यातील प्रत्येक व्यक्तीला आदर आणि प्रेम मिळतं. अशा परिस्थितीत भाजपकडून राजघराण्यातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यामुळं इथं त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link