पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोड

Sat, 08 Jun 2024-7:44 am,

अशा अनोख्या आणि प्रत्येक वेळी वेगळं रुप दाखवणाऱ्या माथेरानला येण्याचा बेत यंदाच्या पावसाळ्यात आखत असाल, तर ही बातमी तुमचा हिरमोड करू शकते. 

ही बाब नवी नसली, तरीही माथेरानचं आकर्षण असणारी येथील मिनी ट्रेन पाहण्याच्या हेतूनं तुम्हीही या भागात येणार असाल, तर काहीशी निराशा नक्कीच होणार आहे. 

 

कारण, पर्यटकांची लाडकी माथेरानची मिनी ट्रेन शनिवारपासून पुढील 4 महिन्यांच्या पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानची सेवा आज पासून बंद करण्यात आली आहे. 

 

माथेरानच्या डोंगररांगांतून फेरी मारणारी ही ट्रेन बंद राहणार असली तरीही अमन लॉज ते माथेरान ही सेवा मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळं पर्यटकांना शंभर टक्के आनंद मिळाला नाही, तरीही काही अंशी हा अनुभव मात्र घेता येणार आहे. 

 

दरवर्षी 15 जूनपासून पावसाळी कालावधीसाठी ही रेल्वेसेवा बंद होते.  मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचं आगमन लवकर असल्याने एका आठवडा आधीच ही सेवा बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. 

मध्य रेल्वे प्रशासनानं यासंदर्भातील माहिती दिली. आता ही माथेरानची राणी थेट 15 ऑक्टोबर नंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळं माथेरानचा बेत आखणार असाल, तर या अनोख्या सफरीला तुम्ही मुकाल हे खरं.

 

मुंबई, ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आकडा येत्या दिवसांत वाढणार असून, हे ठिकाण फुलून जाणार हे नक्की. पण, तिथं जाऊन बेभान होण्यापेक्षा एक जबाबदार पर्यटक होता आलं, तर त्याचा फायदा तुम्हालाही आणि माथेरानलाही होईल. हो ना? 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link