T20 World Cup 2024 : `रोहित शर्माला आयपीएलमधून ब्रेक द्या`, वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनची मागणी

Saurabh Talekar Wed, 08 May 2024-9:37 pm,

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियाचा माजी वर्ल्ड कप विनर कॅप्टन मायकल क्लार्क याने रोहित शर्माला विश्रांतीचा सल्ला दिलाय. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं कौतूक देखील केलंय. 

रोहित स्वत:च्या कामगिरीचं अधिक चांगलं आकलन करू शकतो. विशेषत: रोहितने आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केल्यामुळे मला वाटतं की तो आता थोडा थकला आहे, असं मायकल क्लार्कने म्हटलं आहे.

अशा परिस्थितीत हिटमॅनला स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी ब्रेक खूप महत्त्वाचा आहे. मात्र, तो मुंबई इंडियन्सचाही महत्त्वाचा खेळाडू आहे. अशा स्थितीत त्यांना विश्रांती मिळणं कठीण आहे, असंही मायकल क्लार्कने म्हटलं आहे.

रोहितला फॉर्ममध्ये परतण्याची गरज आहे. रोहितसारख्या खेळाडूसाठी हे अवघड नाही. तो इतका प्रतिभावान आहे की त्याला त्याच्या फॉर्मसाठी फार काळ थांबावं लागणार नाही, अशा विश्वास देखील रोहितने व्यक्त केला आहे.

रोहित शर्मासह हार्दिक पांड्या देखील टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. पांड्याने मागील काही सामन्यात चांगली गोलंदाजी केल्याने तो संघात प्रभावी ठरू शकतो, असंही क्लार्कने म्हटलं आहे.

रोहित शर्मा याच्यासह जसप्रीत बुमराहला देखील आराम दिला जाणार का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link