पावसात अशी घ्या मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची काळजी!

Mansi kshirsagar Thu, 27 Jun 2024-6:58 pm,

पावसाळ्यात सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची काळजी घेणे गरजेचे आहे. खासकरुन मोबाइल, स्मार्टवॉच. जर या उपकरणांमध्ये पाणी गेलं तर हे मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. 

इलेक्ट्रॉनिक गॅझेट पाण्यात भिजू नये म्हणून वॉटर रेपलेंट स्क्रीन प्रोटेक्टर वापरा. त्याचबरोबर वॉटरप्रुफ बॅगचा वापर करा.  स्मार्टफोनसाठी सिलिकॉन कव्हरचा वापर करा. तसंच, सिलिका जेल पॅकचा वापर करु शकता. 

 जर तुमचा स्मार्टफोन पावसात भिजला असेल तर त्याला लगेचच ऑन करण्याचा प्रयत्न करु नका. तसंच, लगेचच चार्ज करण्यासाठीदेखील ठेवू नका. स्मार्टफोनमधून पाणी काढण्याचा प्रयत्न करु नका. चार्जिंग पोर्टमध्ये फूक मारुन पाणी काढू नका. 

स्मार्टफोन पाण्यात भिजला असेल तर हेअर ड्रायरच्याऐवजी व्हॅक्युम क्लीनरचा वापर करा. किंवा फोन मायक्रोफायबर टॉवेलनेच ड्राय करा. त्यानंतर सिलिका जेलच्या पॅकेटसोबत एखाद्या डब्ब्यात ठेवून द्या. त्यानंतरही जर फोन सुरू झाला नाही तर एखाद्या फोनच्या गॅलरीत जा. 

पावसात सगळ्यात पहिले फटका बसतो तो ईअरफोनला. अशावेळी इअरफोनसाठी सिलिकॉन कव्हर खरेदी करा. किंवा वॉटरप्रुफ केस हेडफोनसाठी खरेदी करु शकता. 

स्मार्टवॉच हे 24 तास आपल्या हाताला बांधलेले असते. अशावेळी पावसाच्या पाण्याच्या संपर्कात सर्वात आधी येते. खरंतर स्मार्टवॉच हे वॉटरप्रुफ असतात. पण जर तुमचं वॉच वॉटरप्रुफ नसेल तर सिलिकॉन कव्हरमध्ये ठेवू शकता. 

 इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये लॅपटॉप हा सगळ्यात महाग असतो. त्यामुळं शक्यतो वॉटर प्रुफ बॅग खरेदी करा. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link