PHOTO: चमत्कारिक मंदिर! इथं पावसाच्या 7 दिवस आधीच कळतो हवामानाचा तंतोतंत अंदाज
कानपूरच्या घाटमपूरजवळील बेंहटा गावात तब्बल चार हजार वर्षांपूर्वीचं एक भगवान जगन्नाथ मंदिर आहे. या प्राचिन मंदिराचं खास वैशिष्ठ्य देखील आहे.
भगवान जगन्नाथ मंदिर खास पावसाच्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहे. आता मंदिर भविष्यवाणी कसं करत असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
स्थानिकांची अशी मान्यता आहे की, या मंदिरातील छतावरून पावसाच्या 7 दिवसआधीच पाणी गळतं. यावरून नागरिक पावसाचा अंदाज लावतात.
मंदिरात असलेल्या भगवान जगन्नाथ मंदिराच्या मुर्तीच्या वर एक चमत्कारिक दगड आहे. या दगडाला पावसाचा अंदाज लावता येतो, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, दगडातून किती मोठे थेंब पडतात, यावरून पाऊस जास्त होणार की कमी? यावरून अंदाज देखील वर्तविले जातात. स्थानिकांना हवामान खात्याची गरज नाही.