Nag Panchami 2024 : सापांच्या जीभेला दोन भाग का असतात? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

नेहा चौधरी Mon, 05 Aug 2024-1:12 pm,

सापांची उत्पत्ती महाभारतातही सांगण्यात आलीय. महाभारतानुसार महर्षी कश्यप यांना तेरा बायका होत्या. त्यातील एकाचे नाव कद्रू. कद्रूने आपले पती महर्षी कश्यप यांची सेवा करून प्रसन्न केलं आणि वरदान मागितलंय की, तिला एक हजार आश्चर्यकारक सर्प पुत्र होतील. महर्षी कश्यप यांनी वरदान दिलं, त्यामुळे सर्प वंशाचा जन्म झाला.

एकदा कद्रू आणि विनता यांना एक पांढरा घोडा दिसला. कद्रू म्हणाली, 'हा घोडा पांढरा असला तरी शेपूट काळी आहे.' विनता म्हणाली, 'हा घोडा पूर्ण पांढरा आहे.' यावरून दोघांनी पैज लावली. पैज जिंकण्यासाठी, कद्रूने आपल्या सर्पपुत्रांना त्यांचा आकार कमी करण्यास सांगितलं आणि घोड्याच्या शेपटीला चिकटून राहण्यास सांगितलं, जेणेकरून घोड्याची शेपटी काळी दिसेल. नागांनी तेच केलं आणि कद्रू पैज जिंकली. 

पैज हरल्यामुळे विनता कद्रूची दासी बनली. विनताचा मुलगा पक्षिरत गरुड याला जेव्हा हे कळलं तेव्हा तो सापांजवळ गेला आणि म्हणाला, 'माझी आई तुझ्या गुलामगिरीतून मुक्त व्हावी म्हणून मी तुला कोणती वस्तू आणू?' तेव्हा साप म्हणाला, तू स्वर्गातून अमृत आणलेस तर तुझी आई गुलामगिरीतून मुक्त होईल.'

तो स्वर्गातून अमृत घेऊन आला आणि त्याची आई विनता कद्रूच्या गुलामगिरीतून मुक्त झाली. अमृत ​​पिण्याआधी नाग आंघोळीला गेला तेव्हा भगवान इंद्राने ते अमृताचे भांडे घेऊन स्वर्गात परत नेले. हे पाहून सापांनी अमृताचे भांडे ठेवलेले गवत चाटायला सुरुवात केली आणि विचार केला की या ठिकाणी काहीतरी अमृत असेल. पण धारदार गवतामुळे सापाच्या जिभेचे दोन तुकडे झाले.

तर यामागे वैज्ञानिक कारणही सांगण्यात आलंय. फ्रान्सचं वैज्ञानिक बर्नार्ड जर्मेन डे लेसेपेडे यांनी यामागील कारण सांगितलंय. सापांची दोन भागात विभागलेली जीभ ही टेस्टचा डबल आनंद घेण्यासाठी आहे. तर 17 व्या शतकातील वैज्ञानिक जियोवानी बॅटिस्टा होडिर्ना म्हणाले की, साप आपल्या जिभेने माती उचलतात. कारण त्यांना सतत जमिनीवरून सरपटत जायचं असतं. तर इतर वैज्ञानिकांचं असं मत होतं की, साप आपल्या जिभेने कीटकांना पकडतात.

यूनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टीकटमध्ये इकोलॉजी आणि इव्हॉल्यूशनरी बायोलॉजीचे प्राध्यापक कर्ट श्वेंक यांच्या मतानुसार, आपल्या भव्य आणि भयावह नातेवाईकांच्य पायाखाली येऊ नये म्हणून साप मातीतील खड्ड्यांमध्ये किंवा बिळात लपून रहायचे. सापांच शरीर लांब, बारीक आणि सिलेंडरसारखं असतं. त्यांना पाय नसतात. प्रकाश नसेल तर त्यांना धुसर दिसतं. सापांची जीभ त्यांच्यासाठी नाकाचं काम करते. ते गंध घेण्यासाठी जीभ हवेत फिरवतात.

प्रसिद्ध लेखक शेक्सपिअर यांनी एक मजेदार थेअरीही मांडलीय. ते म्हणाली की, साप आपल्या जिभेने दुश्मनांना मारतात. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link