सरपंच ते खासदार! काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या वसंत चव्हाणांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

नेहा चौधरी Mon, 26 Aug 2024-2:32 pm,

15 ऑगस्ट 1954 रोजी जन्म झालेल्या वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी मिळाले. 

तब्बल 24 वर्ष सरपंच, विधानं परिषद सदस्य, दोन वेळा विधानसभा आमदार ते आता खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. त्यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरलीय. 

1987 साली ते नायगावचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 24 वर्ष ते या पदावर कार्यरत होते. 1990 मध्ये जिल्हा परिषद सदस्यही होते. 

त्यांचा राजकीय प्रवास पाहता, 2002 मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेत त्यानंतर 2009 मध्ये अपक्ष आणि 2014 मध्ये काँग्रेसकडून त्यांनी नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले. 

त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत, भाजपचा हात धरला. त्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसला मरगळ आली होती. 

 

यावेळी काँग्रेसकडून सक्षम चेहऱ्याचा शोध सुरु असताना राहुल गांधी यांनी वसंतराव यांच्यावर विश्वास ठेवला. भाजपच्या तोडीची प्रचार यंत्रणा नसतानाही नांदेडमध्ये वसंतराव यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा 50 हजारावर मतांनी धुळ चारली. 

त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी मिळाली खरी पण प्रकृतीच्या कारणाने वसंतराव यांना हवं तसं काम करता येत नव्हतं. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link