Nepal Bus Accident : नेपाळ बस दुर्घटनेतील 27 जणांचे मृतदेह जळगावात दाखल, आता उरल्या फक्त आठवणी आणि फोटो, अनेक कुटुंब शोकसागरात

Sun, 25 Aug 2024-1:43 pm,

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल, दर्यापूर गावातील या लोकांच्या आता फक्त आठवणी आणि फोटो उरल्या आहेत. कोणी कुटुंबातील कर्ता पुरुष, घरातील माऊली, उद्याची स्वप्न पाहणी तरुण तर काही घरातील दाम्पत्यांची प्राणज्योत या अपघातात मालवलीय. 

या बसमध्ये एकूण 41 जण होती. त्यातील 27 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर 3 जणांचा उपचारादरम्यान जीव गेला. शिवाय 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रक्षा खडसे यांनी काठमांडूला जाऊन जखमींची विचारपूस केली. 

नेपाळळा जळगावमधून जवळपास 100 लोक देवदर्शनासाठी गेले होते. या अपघात मृत पावलेले 25 जण हे जळगावातील होते. साइडपट्टीवरून डाव्या बाजूकडील चाक घसरून अनियंत्रित बस मर्स्यांगडी नदीत कोसळल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. या अपघातात चार कुटुंबातील 14 जणांवर काळाने घाला घातला.

वरणगावातील गणेश नगरातील सरोदे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय. आता या कुटुंबात फक्त आजी आणि नातू एवढंच उरले आहेत. यात संदीप सरोदे हे पत्नी पल्लवी सरोदे, मुलगी, भाऊ, वहिणी आणि पुतण्यासह दर्शनासाठी गेले होते. 

माजी नगरसेवक सुधाकर जावळे, त्यांची पत्नी आणि त्यांच्या परिवारातील दोघांचा या अपघात जीव गेला आहे. सुधाकर जावळे यांचा मुलगा शुभमच्या मनाला चटका लागलाय. कारण त्याला आईशी शेवटच बोलता आलं नाही. झालं असं की, गुरुवारी रात्री वडील पोखराला पोहोचल्यावर त्यांनी शुभमला फोन केला होता. त्यावेळी आई बाहेर असल्याने त्याला बोलता आलं नाही. सकाळी आईला फोन करेल असं ठरवलं. पण नियतीचा खेळ माय लेकीच बोलणं होण्यापूर्वीच बसला अपघात झाला. 

वरणगावात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये चुली पेटल्या नाहीत. मृतदेहाची वाट पाहत नागरिक शोकमग्न अवस्थेत पाहिला मिळाले. मृतांच्या घरांजवळ नातलग, मित्रपरिवार, स्नेहींनी दिवसभर गर्दी केल्याच दिसत होतं. ग्रामस्थांचा प्रचंड आक्रोश आणि शोककळा पसरली होती. 

त्यातील एका प्रवाशांने सांगितलं की, रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून पायाखालची वाळू सरकली. शुक्रवारी (23 ऑगस्ट) ला सकाळी पोखरामधून बस काठमांडूला निघाली. केसरवाणी टूर्सच्या दोन लक्झरी बसमधून प्रवास सुरु झाला. पहिली बस अंबुखैरेनी गावाच्या जवळपास दहा ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेलवर चहापाण्यासाठी थांबली होती. दुसऱ्या बसची वाट पाहत असताना सव्वाअकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान तुमच्या दुसऱ्या बसला अपघात झाला अशी माहिती दिली. 

ही बातमी कळताच प्रवाशांवर आभाळच कोसळलं. प्रवाशी म्हणाली की, चहा-नाष्ट्याच्या प्लेट बाजूला ठेवत आम्ही सर्व आमच्या गाडीतील प्रवासी फटाफट लक्झरीत बसून घटनास्थळी गेलो. सुरुवातीला किरकोळ अपघात असावा असं वाटलं. एकमेकांना धीर देत आम्ही पोहोचलो. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रात तब्बल 500 फूट खोल दरीत बस कोसळली होती.

समोरील दृश्यं पाहून आमच्यातील बऱ्याच जणांनी आणि महिलांनी हंबरडा फोडला. मन आणि डोकं सुन्न झालं होतं. काही सुचत नव्हत पण धीर गोळा करत. मदतीसाठी हालचाल सुरु केली. स्थानिक लोक मदतीला आलेत. कोणाच्याही मोबाईला रेंज नव्हती. मग कसा बसा एकाचा मोबाईलला रेंज आली जीवन सरोदे माझ्या मुलाला फोन केला आणि अपघाताची माहिती दिली आणि मदतीसाठी सांगितलं. 

मुलाने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांना माहिती दिली आणि मदतीचा ओघ वाढला. पण इथे सगळं एका क्षणात होत्याच नव्हतं झालं होतं. मदत कार्य जोरदार सुरु होत. जखमींच्या किंचाळ्यांनी आमचा जीव हेलावला गेला होता. रक्ताच्या थारोळ्यातून येणारे मृतदेह आणि जखमींना पाहून पायाखालची वाळूच सरकली होती.

हवाई दलाच्या विमानाने 27 जणांचं मृतदेह शनिवारी रात्री जळगावमध्ये दाखल झाले. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांनी 2 लाखांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केलीय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदतची घोषणा केलीय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link