PHOTO: आमिर खानच्या मुलाची पहिली वेब सीरिज `या` दिवशी होणार रिलीज

Wed, 12 Jun 2024-2:55 pm,

बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' सिनेमा 14 जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

 

या सिनेमामध्ये  कार्तिकसोबत श्रद्धा कपूर देखील झळकणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले असून श्रद्धा आणि कार्तिक यांची पडद्यावरील केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला होता. या ट्रेलरचा अनवीत कौरच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला. 

'लव्ह की अरेंज मॅरेज' सिनेमात अनवीत कौर मुख्य भूमिकेत असून सनी सिंह, अन्नू कपूर, सुप्रिया पाठक आणि राजपाल यादव  हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ZEE5 वर 14 जूनला रिलीज होणार आहे. 

 

द बॉईजच्या तीनही सिझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अशातच आता या सिरीजचा चौथा सिझन 13 जूनला अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. 

 

मूळ तेलुगू असलेली याक्षिणी ही वेबसिरीज हिंदी, तामिळ, बंगाली आणि मराठी भाषेत डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज 14 जूनला रिलीज होणार आहे. 

पत्रकार रसनदास मुळजी यांच्या सामाजिक जीवनावर भाष्य करणारा आणि घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत 'महाराज' सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान हा मुख्य भूमिकेत असून सिद्धार्थ पी मल्होत्राने दिग्दर्शन केले आहे. यशराज फिल्मची निर्मिती असलेली ही सिरीज 14 जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link