...तर पेन्शन मिळणं बंद होईल; पाहा आणि आताच करून घ्या `हे` काम
सरकारकडे तुमच्या हयातीची नोंद ठेवणं पेन्शन मिळवण्यासाठी अतिशय गरजेची असते. यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो.
असं न केल्यास व्यक्तीला सरकारकडून देण्यात येणारी पेन्शन थांबवली जाते. 60 ते 80 वर्षे या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला पेन्शन दिली जाते.
हयातीचा दाखला सरकारपुढे नेमका कसा सादर करायचा हाच प्रश्न अनेकांना पडला असून, या कामासाठी ऑनलाईन कार्यप्रणालीचा वापर करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.
यामध्ये विविध मार्गांनी तुम्ही हयातीचा दाखला सुपूर्द करू शकता. यासाठी Jeewan pramaan portal आणि अॅपचीसुद्धा मदत होते.
1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यानच्या काळात पेन्शनधारकांनी त्यांच्या हयातीचा दाखला Jeewan pramaan portal किंवा अॅपवर देणं बंधनकारक असेल. यासाठी AadhaarFaceRD Jeevan Praman Face App डाउनलोड करा.
तिथं आधार कार्ड नंबर देऊन ऑथेंटिकेशन करण्यासाठी चेहरा स्कॅन करा. (तुमचा फोटो काढून सबमिट करा.)
पुढे SMS लिंक च्या माध्यमातून लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठीची लिंक येईल तिथून ते डाऊनलोड करा.