...अन् 140 कोटी स्वप्नं आकाशात झेपावली; भारतीयांचा ऊर भरुन आणणारे Chandrayaan-3 Launching फोटो पाहाच

Swapnil Ghangale Fri, 14 Jul 2023-2:53 pm,

चांद्रयान-2 च्या अपयशानंतर तब्बल 4 वर्षांनी 'इस्त्रो'च्या शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनतीच्या बळावर आज चांद्रयान-3 लॉन्च केलं.

14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावलं. भारताची ही तिसरी चंद्र मोहीम इस्रो एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केली आहे.

हे उड्डाण झाल्यानंतर आणि हे यान नियोजित कक्षेत स्थिरावल्यावर 'इस्त्रो'च्या शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. 

'चांद्रयान-3'च्या या उड्डाणाच्या 26 तासांपूर्वीच उड्डाणासाठीचं काऊण्ट डाऊन सुरु करण्यात आलं होतं. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरील दुसऱ्या बेसवरुन चांद्रयान-3 चं प्रक्षेपण करण्यात आलं.

चांद्रयान-3 चं प्रक्षेपण प्रत्यक्षात पाहण्यासाठी श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटरला मोठ्या नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

चांद्रयान-3 सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन 23 किंवा 24 ऑगस्ट 2023 ला चंद्रावर उतरणार आहे.

चांद्रयान-3 मोहिम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

चांद्रयान-3 चंद्रावर उतरेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लॅण्डींग करण्याची किमया करणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link