Pune News: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!

Tue, 25 Jul 2023-8:17 pm,

पुण्यातील खडकवासला धरण 92 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झालीय. धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 वेगानं विसर्ग सुरू आहे. 

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात  428 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे.

खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत असलं तरी पुण्याच्या पाण्याची चिंता मिटली असं निश्चितच म्हणता येणार नाही. खडकवासला धरण साखळीतील मोठी धरणं जेमतेम 60 ते 65 टक्के इतकीच भरली आहेत.

त्यामुळे पाणी सोडलं जातं असल्याचं दृश्य सुखावणारं असलं तरी धरणक्षेत्रात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात वाहनं, जनावरं असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरीकांनी सतर्क राहावं, असंही जलसंपदा विभागाने कळविलं आहे.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link