`रोहितचा त्यारात्री फोन आला नसता तर...`, ड्रेसिंग रुममध्ये राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा!

Saurabh Talekar Tue, 02 Jul 2024-6:26 pm,

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरल्यानंतर आता हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये राहुलने भावना व्यक्त केल्या.

कर्णधार रोहित शर्माचा मला कॉल आला होता आणि त्याला वनडेतील पराभवानंतर  हेड कोचपदावर कायम राहण्याची विनंती केली होती, असा खुलासा द्रविडने केला आहे.

वनडे वर्ल्ड कप फायनल झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये मला कॉल केल्याबद्दल आणि संघाशी जोडलं जाण्यास सांगितल्याबद्दल खूप खूप आभार मानतो, असं राहुल द्रविड यांनी रोहित शर्माला म्हटलं आहे.

तुमच्या सर्वांसोबत काम करणं हा एक विशेषाधिकार आणि आनंद आहे. तुम्हा सर्वांना हे क्षण नेहमी लक्षात राहतील, असंही राहुल द्रविडने म्हटलं आहे.

वनडे वर्ल्ड कपनंतर तुम्ही ज्याप्रकारे परत आलात त्याचा मला खूप अभिमान आहे, एक संघ म्हणून तुम्ही उत्तम आहात, असंही राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, राहुल द्रविड यांनी ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकवून आणा, असा सल्ला राहुल यांनी टीम इंडियाला दिलाय.

आणखी वाचा - '...म्हणून राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोचसाठी अर्ज केला नाही', जय शहा यांचा मोठा खुलासा

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link