Ratha Saptami 2024 Daan : रथ सप्तमीला करा `या` गोष्टींचं दान! सूर्यदेवाच्या कृपेने बदलणार तुमचं नशीब

Fri, 16 Feb 2024-10:19 am,

रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजेसोबत दानधर्माला अतिशय महत्त्व आहे. सूर्य देवाला प्रसन्न करुन नशिब चमकरण्यासाठी रथसप्तमीला कोणते दान करायचे याला महत्त्व आहे. 

रथ सप्तमी ही दानधर्मासाठी अतिशय खास मानली जाते. यादिवशी विशेष दान केल्यामुळे आपल्या अनेक समस्या दूर होतात. 

घरात सुख समृद्धी नांदावी आणि घरात कायम धनधान्याचा ओघ राहावा म्हणून रथ सप्तमीच्या दिवशी अन्नदान करणे शुभ मानले जाते.

रथ सप्तमीला पाणी दान करणे ज्योतिषशास्त्रात खूप फायदेशीर मानले जाते. मन शांत, एकाग्रता वाढी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी जलदान करणे शुभ मानले जाते. 

रथ सप्तमीला मंदिर, रुग्णालय, धार्मिक स्थळ, शाळा इत्यादी बांधकामासाठी माती दान करणे शुभ मानले जाते. 

रथ सप्तमीला गरजूंना कपडे दान केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 

रथ सप्तमीला एखाद्या गरजूला शिक्षणासाठी, उपचारासाठी किंवा महत्त्वाच्या काम अथवा शुभ कार्यासाठी पैसे दान करणे शुभ मानले जाते. या दानामुळे तुमच्यावर कधीही आर्थिक संकट ओढवत नाही. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link