MMS लीकनंतर उद्धस्त झालं `या` अभिनेत्रीचं करिअर, बॉलिवूडपासून गेली दूर; आता OTT वर..

Pravin Dabholkar Tue, 02 Jul 2024-3:59 pm,

Riya Sen: बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेले अनेक स्टार्स वेगवेगळ्या बॅग्राऊंडमधून पुढे आले आहेत. काहींनी सेलिब्रिटी घराण्यात जन्म घेऊनही स्वत:ची ओळख बनवली तर काहींनी परिस्थितीशी लढून इंडस्ट्रीत नाव कमावले.

अशी एक अभिनेत्री जी रॉयल कुटुंबात जन्म घेऊन बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पणापासून खूप चर्चेत राहिली. मात्र, एका एमएमएसने तिची कारकीर्द उद्ध्वस्त केली.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती दुसरी तिसरी कोणी नसून रिया सेन आहे. रिया ही अभिनेत्री मुनमुन सेन यांची सर्वात लहान मुलगी आणि प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री सुचित्रा सेन यांची नात आहे. तिचे वडील भरत देव वर्मा यांच्या माध्यमातून ती त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित आहे. अवघ्या पाच वर्षांची असताना रियाने आपल्या आईसोबत ऑन-स्क्रीन मुलीची भूमिका साकारली होती.

1991 मध्ये, रियाने विषकन्या चित्रपटातून बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत अधिकृत पदार्पण केले. 2001 मध्ये तिने स्टाइल सिनेमातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. 

या चित्रपटात रिया सेन शर्मन जोशी, साहिल खान आणि शिल्पी शर्मासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसली. एन चंद्रा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. नंतर रिया दिल विल प्यार व्यार, कयामत आणि झंकार बीट्स सारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसली.

रिया सेन 2005 मध्ये तिच्या करिअरच्या टॉपवर होती. त्यावेळी तिचा कथित बॉयफ्रेण्ड अश्मित पटेलसोबतचा एक अश्लील MMS ऑनलाइन लीक झाला होता. या स्कॅंडलमध्ये रिया सेन पुरती अडकली होती. 

यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले आणि रियाने अश्मितवरच क्लिप लीक केल्याचा आरोप केला. रिया तिच्या बोल्ड सीन्स आणि ग्लॅमरस व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध होती. ती योग्य यशाच्या ट्रॅकवर होती. पण या घटनेचा तिच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होत गेला. 

यानंतर रिया सेनने हिंदी, बंगाली, तेलगू आणि ओरिया या भाषांमधील सुमारे 15 चित्रपटांमध्ये काम केले. पण स्कॅंडलमध्ये अडकल्यानंतर तिचा कोणताही चित्रपट हिट झाला नाही. 

तिच्या कोणत्याच सिनेमाला व्यावसायिकदृष्ट्या यश मिळाले नाही. 2016 च्या दरम्यान आलेले हिरो 420 आणि डार्क चॉकलेट सिनेमात ती दिसली. 

2017 मध्ये तिने रागिनी MMS: Returns या वेब सीरिजमध्ये एका छोटी भूमिका करुन ओटीटीवर एन्ट्री केली. यानंतर ती पॉयजन, मिसमॅच 2, पत्नी पत्नी और हू आणि बेकाबू यांसारख्या सिरिजमध्ये दिसली आहे. लोन्ली गर्ल, लव्ह यू ऑल्वेज आणि डेथ टेल या चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link