Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षिय मालिका व्हावी का? कॅप्टन रोहितने दिलं मनमोकळं उत्तर, म्हणतो...

Saurabh Talekar Thu, 18 Apr 2024-6:53 pm,

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. तेव्हापासून दोन्ही संघ फक्त आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.

द्विपक्षीय मालिकाच नाही तर भारत पाकिस्तानसह तिरंगी मालिका देखील खेळत नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेकदा वाद झाल्याचं गेल्या काही वर्षात दिसून आलं होतं. 

 

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका रोखण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने कठोर निर्णय घेतले होते.

आता भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघात आयसीसीच्या स्पर्धेत कडवी टक्कर पहायला मिळते. त्यावरून कॅप्टन रोहितला प्रश्न विचारण्यात आला होता.

भारत पाकिस्तानशी नियमितपणे खेळणे कसोटी क्रिकेटसाठी चांगले होईल का? असं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने रोहितला विचारलं. 

माझा यावर पूर्ण विश्वास आहे. पाकिस्तान एक चांगला संघ आहेत. त्यांच्याकडे जबरदस्त गोलंदाजी आहे. मला वाटतं की हा एक चांगला सामना असेल, असं रोहितने म्हटलं आहे.

तुला पाकिस्तानसोबत नियमित मालिका बघायच्या आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर रोहिने मोठं वक्तव्य केलं. मला नक्कीच आवडेल.  मला फक्त निव्वळ क्रिकेटमध्ये रस आहे. मी दुसरे काही बघत नाही. हे शुद्ध क्रिकेट आहे. बॅट आणि बॉलमध्ये स्पर्धा असते. ही जबरदस्त टक्कर असेल मग का नाही? असं रोहित म्हणाला.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link