Roti Benefits For Diabetes : `या` पिठाच्या भाकरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी, रक्तातील साखर घेतात शोषून

Tue, 24 Jan 2023-4:21 pm,

जवाचं पीठ म्हणजेच जव...हे पीठ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशी आहे. कारण यात फायबर, व्हिटॅमिन-सी आणि ए असं पोषक घटक आढळतात. यामुळे तुमच्या शरिरातील इन्सुलिनची पातळी सामान्य आणि नियंत्रणात राहते. याशिवाय हे पीठ खाल्ल्यामुळे तुमचं कोलेस्ट्ऱॉलची पातळीही नियंत्रित राहते. 

 

नाचणीचं पीठ हे फायबरयुक्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगलं मानलं जातं. नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी खाल्ल्याने तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. यामुळे तुम्ही जास्त अन्न खात नाही आणि तुमचं वजन वाढत नाही. 

ओट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय, यामध्ये कमी कॅलरी असल्याने तुमचं वजन नियंत्रणात राहतं. 100 ग्रॅम ओट्समधून शरीराला 68 कॅलरीज आणि 21 ग्रॅम फायबर मिळतं.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीचं पीठ हा एक चांगला पर्याय मानला जातो. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 

या पिठात पोषक तत्व भरपूर असल्याने मधुमेहाच्या रूग्णासाठी फायदेशीर आहे. या पिठात प्रोटीन, खनिज, व्हिटामिन, आणि लिपिडसारखी पोषक तत्व आढळतात. यामुळे साखर नियंत्रणात राहते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link